👉 नील उठाव (१८५९-६०)
🔹 नील उठाव नेतृत्व: दिगंबर बिस्वास आणि विष्णू बिस्वास (नदिया जिल्हा, बंगाल).🔹नील दर्पण नाटक: दीनबंधू मित्र (शेतकऱ्यांच्या शोषणाचे चित्रण).
हिंदू पेट्रियटचे संपादक हरिश्चंद्र मुखर्जी यांनी या उठावाला वर्तमानपत्रातून मोठे समर्थन दिले.
👉पाबना शेतकरी बंड (१८७३):
🔹(बंगाल).
🔹नेतृत्व: ईशानचंद्र रॉय आणि शंभू पाल.
🔹घोषणा: 'आम्हाला केवळ महाराणीचे रयत व्हायचे आहे'.
👉 दख्खनचे दंगे (१८७५)
🔹तात्कालिक कारण: शिरूर (पुणे) येथील काळूराम मारवाडी या सावकाराने शेतकरी बाबा साहेब निमकर यांच्या घराची जप्ती आणली.
🔹उठावाची सुरुवात: मे १८७५, सुपे (पुणे). दंग्यांचा प्रसार पुणे आणि अहमदनगर या दोन मुख्य जिल्ह्यांत झाला.
🔹दंग्यांचे स्वरूप: मारवाडी आणि गुजराती सावकारांचे गहाणखत व दस्तऐवज (कर्जबाजारीपणाचे पुरावे) जाळणे.
🔹 Deccan Riots Commission: दंग्यांच्या चौकशीसाठी ब्रिटिश सरकारने नियुक्त केला.
🔹डेक्कन ॲग्रीकल्चरिस्ट्स रिलीफ ऍक्ट: १८७९ मध्ये मंजूर (सावकारांकडून शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्यास प्रतिबंध करण्यासाठी).
♦️उत्तर भारतातील शेतकरी चळवळी (१९२०-१९३० चा दशक)
👉उत्तर प्रदेश किसान सभा (१९१८): गौरीशंकर मिश्रा, इंद्रनारायण द्विवेदी आणि मदन मोहन मालवीय यांनी स्थापना केली.
👉अवध किसान सभा (१७ ऑक्टोबर १९२०): बाबा रामचंद्र (मूळचे महाराष्ट्र-ग्वाल्हेरचे, खरे नाव रामचंद्र श्रीधर परांजपे). प्रतापगढ येथे स्थापना.
👉 एका चळवळ (१९२१-२२): मदारी पाशी आणि सहरेव (उत्तर प्रदेश). मुख्य कारण: ठरलेल्या खेड्यांच्या भाड्यापेक्षा ५०% जास्त बेकायदेशीर कर वसुली करणे.
👉तेभागा चळवळ (१९४६-४७): बंगाल. मुख्य मागणी: एकूण उत्पादनाचा २/३ (तेभागा) हिस्सा कुळांना मिळावा आणि जमीनदारांना फक्त १/३ हिस्सा मिळावा. नेतृत्व: कंपाराम सिंह आणि भवन सिंह.
👉बारडोली सत्याग्रह (१९२८)
🔹 मुख्य कारण: मुंबई सरकारने बारडोली तालुक्यात जमीन महसुलात २२% वाढ केली होती.
🔹नेतृत्व: वल्लभभाई पटेल (महात्मा गांधींच्या सल्ल्याने नेतृत्व स्वीकारले).
🔹सरदार पदवी: सत्याग्रह यशस्वी झाल्यानंतर बारडोलीच्या महिलांच्या वतीने भक्तीबा यांनी वल्लभभाईंना 'सरदार' ही पदवी दिली.
👉मॅक्सवेल-ब्रूमफिल्ड समिती: या सत्याग्रहाच्या दबावामुळे सरकारने चौकशी समिती नेमली. या समितीने महसूल वाढ २२% वरून ६.०३% पर्यंत कमी केली.
👉पहिली महाराष्ट्र प्रांतिक किसान परिषद (१९३६): जळगाव जिल्ह्यातील टिटवे येथे भरली. अध्यक्ष: कमलादेवी चट्टोपाध्याय.
👉वारली शेतकरी उठाव (१९४५-१९४७)
🔹क्षेत्र: ठाणे जिल्हा
🔹नेतृत्व: शामराव परुळेकर आणि गोदावरी परुळेकर (महाराष्ट्र प्रांतिक किसान सभा).
🔹मुख्य कारण: वेठबिगारी,कुळांची होणारी बेकायदेशीर हकालपट्टी.
🔹गोदावरी परुळेकर यांचे पुस्तक: 'जेव्हा माणूस जागा होतो' (या पुस्तकात या संपूर्ण शेतकरी लढ्याचे ऐतिहासिक वर्णन आहे)
👉बिहार प्रांतिक किसान सभा (१९२९): स्वामी सहजानंद सरस्वती यांनी स्थापना केली.
👉अखिल भारतीय किसान सभा: स्थापना ११ एप्रिल १९३६ (लखनौ). अध्यक्ष: स्वामी सहजानंद सरस्वती, सचिव: प्रा. एन. जी. रंगा.
👉फैजपूर काँग्रेस अधिवेशन (डिसेंबर १९३६): जळगाव (महाराष्ट्र). अध्यक्ष: जवाहरलाल नेहरू.
🔹काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन. येथेच अखिल भारतीय किसान सभेचे दुसरे अधिवेशन भरले आणि काँग्रेसने आपला पहिला अधिकृत 'कृषी कार्यक्रम' मंजूर केला.
👉'किसान' जाहीरनामा: १९३६ च्या इंदूर अधिवेशनात प्रा. एन. जी. रंगा यांनी शेतकऱ्यांचा जाहीरनामा तयार केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा