Tuesday 27 August 2024

भारताच्या विभाजनाबद्दल माहिती


भारताची फाळणी किती वेळा झाली?

ब्रिटिश राजवटीने 61 वर्षांत सात वेळा


 1) अफगाणिस्तान 1876 मध्ये भारतापासून वेगळे झाले.

 2) 1904 मध्ये नेपाळ

 3) 1906 मध्ये भूतान

 4) 1907 मध्ये तिबेट

 5) 1935 मध्ये श्रीलंका

 6) म्यानमार (बर्मा) 1937 मध्ये.

 आणि ...

 7) 1947 मध्ये पाकिस्तान




 अखंड भारताची फाळणी:

पुर्वी अखंड भारत हिमालयापासून हिंदी महासागरापर्यंत आणि इराणपासून इंडोनेशियापर्यंत विस्तारलेला होता.

 1857 मधे भारताचे क्षेत्रफळ 83 लाख चौरस किलोमीटर होते आणी सध्या 33 लाख चौरस किमी आहे.

 वर्ष 1857 ते 1947 या कालावधीत भारताचे बाह्य शक्तींनी अनेक वेळा तुकडे केले.

पूर्वीच्या भारतापासून विभक्त झालेले भाग:


 1) श्रीलंका:


 ब्रिटीशांनी 1935 मध्ये श्रीलंका भारतापासून वेगळी केली.

श्रीलंकेचे जुने नाव सिंहलद्वीप होते.

सिंहलद्वीप हे नाव नंतर सिलोन असे ठेवण्यात आले.  सम्राट अशोकाच्या काळात श्रीलंकेचे नाव ताम्रपर्णी होते. 

सम्राट अशोकाचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी श्रीलंकेत गेले होते.  श्रीलंका हा अखंड भारताचा एक भाग होता.


 2) अफगाणिस्तान:

 अफगाणिस्तानचे प्राचीन नाव उपगणस्थान होते आणि कंधारचे नाव गांधार होते.

अफगाणिस्तान हा एक शैव देश होता.

महाभारतात वर्णन केलेले गांधार हे अफगाणिस्तानात आहे.

कौरवांची आई गांधारी आणि मामा शकुनी यांचा जन्म येथेच झाला होता.

कंधारचे वर्णन (म्हणजे गांधार) शहाजहानच्या कारकिर्दीपर्यंत सापडते.

तो भारताचा एक भाग होता.

1876   मध्ये रशिया आणि ब्रिटनमध्ये एक करार झाला.  करारानंतर, अफगाणिस्तान एक स्वतंत्र देश म्हणून स्वीकारला गेला.


 3) म्यानमार (बर्मा):

म्यानमारचे (बर्मा) प्राचीन नाव ब्रह्मदेश होते.

1937 मधे म्यानमार म्हणजेच बर्माला स्वतंत्र देशाची मान्यता ब्रिटिशांनी दिली.

प्राचीन काळी हिंदू राजा आनंदवर्ताने येथे राज्य केले होते.


 4) नेपाळ:

 नेपाळ प्राचीन काळात देवघर म्हणून ओळखले जात असे.

भगवान बुद्धांचा जन्म लुंबिनी येथे झाला आणि आई सीतेचा जन्म जनकपूर येथे झाला जो आज नेपाळमध्ये आहे.

1904 मध्ये ब्रिटिशांनी नेपाळला एक स्वतंत्र देश बनवले.

काही वर्षांपूर्वीपर्यंत नेपाळच्या राजाला नेपाळ नरेश म्हटले जात असे.

नेपाळमध्ये 81 टक्के हिंदू आणि 9% बौद्ध आहेत.


सम्राट अशोक आणि समुद्रगुप्त यांच्या काळात नेपाळ हा भारताचा अविभाज्य भाग होता.

1951 मधे नेपाळचे महाराजा त्रिभुवन सिंह यांनी भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना नेपाळचे भारतात विलीनीकरण करण्याचे आवाहन केले पण जवाहरलाल नेहरूंनी हा प्रस्ताव नाकारला.


 5) थायलंड:


 थायलंडला 1393 पर्यंत स्याम/सयाम म्हणून ओळखले जात होते.

अयोध्या, श्री विजय इत्यादी प्रमुख शहरे होती. स्याममधील बौद्ध मंदिरांचे बांधकाम तिसऱ्या शतकात सुरू झाले.

आजही या देशात अनेक शिवमंदिरे आहेत.

थायलंडची राजधानी बँकॉक मधे शेकडो हिंदू मंदिरे आहेत.


 6) कंबोडिया:


कंबोडिया संस्कृत नाव कंबोज पासून आले आहे,

हा अखंड भारताचा भाग होता.

भारतीय वंशाच्या कौंडिन्य राजवंशाने पहिल्या शतकापासूनच येथे राज्य केले.

येथील लोक शिव, विष्णू आणि बुद्ध यांची पूजा करायचे.

राष्ट्रभाषा संस्कृत होती.

कंबोडियामध्ये आजही चेत्र, वैशाख, आषाढ या भारतीय महिन्यांची नावे वापरली जातात.


जगप्रसिद्ध अंकोरवट मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे, हे हिंदू राजा सूर्यदेव वर्मन यांनी बांधले होते.  मंदिराच्या भिंतींवर रामायण आणि महाभारताशी संबंधित चित्रे आहेत.

अंकोरवटचे प्राचीन नाव यशोधरपूर आहे.


 7) व्हिएतनाम:

 व्हिएतनामचे प्राचीन नाव चंपादेश आहे आणि त्याची प्रमुख शहरे इंद्रपूर, अमरावती आणि विजय होती.

अनेक शिव, लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती मंदिरे आजही इथे सापडतील.

येथे शिवलिंगाचीही पूजा करण्यात यायची.

लोकांना चाम असे म्हटले गेले जे मूळ शैव होते.


 8) मलेशिया:

 मलेशियाचे प्राचीन नाव मलय देश होते.

 हा एक संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ पर्वतांची जमीन आहे.

मलेशियाचे वर्णन रामायण आणि रघुवंशम मधे देखील आहेत.

मलय देशात शैव धर्म पाळला जात होता.

देवी दुर्गा आणि गणपतीची पूजा करण्यात यायची.

येथील मुख्य लिपी ब्राह्मी होती आणि संस्कृत ही मुख्य भाषा होती.


 9) इंडोनेशिया:

इंडोनेशियाचे प्राचीन नाव दीपंतर भारत आहे ज्याचा उल्लेख पुराणांमध्ये देखील आहे.

दीपंतर भारत म्हणजे संपूर्ण भारतीय भुमी नंतरचा समुद्राच्या नंतरचा प्रदेश .

तेथे हिंदू राजांचे राज्य होते.

सर्वात मोठे शिव मंदिर जावा बेटावर होते.


सर्वच मंदिरात प्रामुख्याने भगवान राम आणि भगवान श्रीकृष्ण यांची शिल्पे कोरलेली आढळतात.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...