23 April 2025

कुशाण राजे आणि सम्राट कनिष्क

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

✅भारतामध्ये निरनिराळ्या लोकांच्या टोळ्या बाहेरून सतत येत राहिल्या.

➡️त्यांमध्ये मध्य आशियातून आलेल्या 'कुशाण' नावाने ओळखल्या जाणाऱ्या टोळ्या होत्या.

इसवी सनाच्या पहिल्या शतकात वायव्येकडील प्रदेशात आणि काश्मीरमध्ये त्यांनी राज्य स्थापन केले.

भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात कुशाण राजांनी केली.

➡️नाण्यांवर गौतम बुद्ध आणि विविध भारतीय देवता यांच्या प्रतिमा वापरण्याची प्रथा कुशाण राजांनी सुरू केली.

कुशाण राजा कनिष्क याने साम्राज्याचा विस्तार केला.


✔️सम्राट कनिष्क : -

कनिष्काचे साम्राज्य पश्चिमेला काबूलपासून पूर्वेला वाराणसीपर्यंत पसरले होते.

➡️कनिष्काची सोन्याची आणि तांब्याची नाणी सापडली आहेत.

कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद काश्मीरमध्ये भरवण्यात आली होती.

कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसवले होते. श्रीनगरजवळ असलेले काम्पूर नावाचे गाव म्हणजेच कनिष्कपूर असावे.

➡️कनिष्काच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला. त्याने 'बुद्धचरित' आणि 'वज्रसूचि' हे ग्रंथ लिहिले.

कनिष्काच्या दरबारात चरक हा प्रसिद्ध वैदय होता.

No comments:

Post a Comment