Friday 3 May 2024

राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा प्रश्नसंच

प्र.1. भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली? (राज्यसेवा मुख्य २०१५)

१) उद्देशपत्रिका २) मूलभूत अधिकार

३) मूलभूत कर्तव्ये ४) मार्गदर्शक तत्वे


प्र.2. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही ……..आहे. (राज्यसेवा मुख्य २०१२)

अ) राज्यघटनेचे हृदय ब) राज्यघटनेचा आत्मा

क) राज्यघटनेचे डोके ड) यापैकी नाही

योग्य पर्याय निवडा: –

१) अ व क २) ब व क

३) फक्त ब ४)फक्त ड


प्र.3. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमत: केव्हा दुरुस्त करण्यात आली? (राज्यसेवा मुख्य २०१२)

१) १९५२ २) १९६६

३) १९७६ ४) १९८६


प्र.4. खालीलपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णयाद्वारे प्रास्ताविका ही घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन करण्यात आले? (राज्यसेवा मुख्य २०१३)

4) बेरुबरी खटला

२) गोलकनाथ खटला

३) केसवानंद भारती खटला

४) बोम्मई विरुध्द भारताचे संघराज्य


प्र.5. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतील ‘सार्वभौम’ या संकल्पनेतून खालीलपैकी कोणकोणता अर्थ ध्वनित होतो? (राज्यसेवा मुख्य २०१३)

अ) बाह्य हस्तक्षेपाविना भारत स्वत:शी निगडीत निर्णय घेऊ शकतो व रद्द करु शकतो.

ब) संघ आणि घटक राज्ये दोन्ही सार्वभौम आहेत.

क) भारताचा संघ परकीय भूप्रदेश हस्तगत करु शकतो.

ड) भारताच्या संघाकडे राष्ट्रीय भूप्रदेशात फेरफार करण्याचे अधिकार आहेत.

पर्याय उत्तरे :

१) ब,क,ड २) अ,ब,क

३)अ,क,ड ४)अ,ब,ड


प्र.6. खालील मुद्यांचा विचार करा.(राज्यसेवा मुख्य २०१४)

अ) भारतीय संविधानाचे तत्वज्ञान पंडित नेहरुंच्या ऐतिहासिक उद्दिष्टांच्या ठरावात अनुस्यूत होते.

ब) हा ठराव संविधान सभेने २२ जानेवारी १९४८ रोजी स्वीकृत केला.

१) दोन्ही बरोबर आहेत २) दोन्ही चूक आहेत

३) ब बरोबर आहे ४) अ बरोबर आहे


प्र.7.भारतीय राज्यघटनेचे ‘आर्थिक न्याय’ हे उद्दिष्ट ……यातून व्यक्त होते. (राज्यसेवा मुख्य २०१५)

१) प्रस्तावना आणि मूलभूत अधिकार

२) प्रस्तावना आणि मार्गदर्शक तत्वे

३) मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे

४) वरीलपैकी एकही नाही


प्र.8. राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेची वर्णने व ज्या विद्वानांनी किंवा न्यायालयांनी ती केली यांची जुळणी करा: (राज्यसेवा मुख्य २०१५)

अ) ‘घटना कर्त्यांचे मन ओळखण्याची किल्ली’ i) पंडीत ठाकुरदास भार्गव

ब) ‘राज्यघटनेचा सर्वात मौल्यवान भाग’ ii) के.एम.मुन्शी

क) ‘राजकीय कुंडली’ iii) भारताचे सर न्यायाधीश ‘सिक्री’

ड) ‘अत्यंत महत्वपूर्ण भाग’ iv) बेरुबारी संदर्भ खटला (१९६०)

अ   ब क   ड

१) iv i ii iii

२) i ii iii iv

३) iii iv i ii

४) ii iii iv i


प्र.9, फाझल अली कमिशनचे सदस्य…………. होते. (राज्यसेवा मुख्य २०१६)

अ) के.एम. पण्णीकर ब) हृदयनाथ कुझरू

क) यशवंतराव चव्हाण ड) अण्णा डांगे

पर्याय

१) फक्त अ,ब २) फक्त क, ड

३) फक्त ब, क ४) वरीलपैकी सर्व


प्र.10. उद्दिष्टांच्या ठरावासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान गैरलागू (राज्यसेवा मुख्य २०१६)

१) पं. जवाहरलाल नेहरू यांनी घटनासमितीपुढे उद्दिष्टांचा ठराव मांडला.

२) दिनांक १३ डिसेंबर १९४६ रोजी उद्दिष्टांचा ठराव घटनासमिती समोर ठेवण्यात आला.

३) उद्दिष्टांचा ठराव हा घटना समितीसाठी दिशादर्शक होता.

४) या ठरावानुसार भारत एक स्वतंत्र, सार्वभौम, समाजवादी आणि गणराज्य म्हणून घोषित करण्यात आले.


प्र.11. खालील विधाने विचारात घ्या( राज्यसेवा मुख्य २०१७)

अ) सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्त्रोतही नाही अथवा कायदेमंडळाचा अधिकारांवर बंधनेही घालत नाही.

ब) सर्वोच्च न्यायालयाने बेरूबारी खटल्यात (१९६०) सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे असे मत मांडले.

क) केशवानंद भारती खटल्यामध्ये (१९७३) सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही असे म्हटले.

ड) भारतीय जीवन विमा निगम खटल्यात (१९९५) सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग नाही असे पुनश्च प्रतिपादन केले.

वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?

१) अ २) अ, क ३) ब, क, ड ४) अ, ब, ड


प्र.12. घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून उचलली.(Asst मुख्य २०१३)

१) आयर्लंड २) यु.के

३) यु.एस.ए ४) ऑस्ट्रेलिया


प्र.13. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रीकेमध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ या शब्दांचा समावेश १९७६ च्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आला. (Asst मुख्य २०११)

१) ४४ वी २) ४१ वी

३) ४२ वी ४) ४६ वी


प्र.14. भारताच्या राज्यघ

टनेच्या उद्देशपत्रिकेवर ……प्रभाव दिसतो. (Asst मुख्य २०१२)

अ) कॅनडाची राज्यघटना

ब) जपानची राज्यघटना

क) इंग्लंडची राज्यघटना

ड) अमेरिकेची राज्यघटना

१) अ व क २) क व ड

३) फक्त ड ४) फक्त ब


प्र.15. १९७६ च्या ४२ व्या घटना दुरुस्तीने प्रस्ताविकेत कोणत्या नवीन शब्दांचा समावेश केला आहे ? (Asst मुख्य २०१३)

अ) सार्वभौम आणि समाजवादी

ब) समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष

क) श्रध्दा, उपासना आणि व्यक्तीची प्रतिष्ठा

ड) एकता आणि एकात्मता

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

१) फक्त ब २) ब आणि क

३) क आणि ड ४) ब आणि ड


प्र.16………….या तारखेपासून भारत एक सार्वभौम, समाजवादी धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य आहे असे भारतीय राज्यघटनेने घोषित केले.(Asst मुख्य २०१५)

१) १३-१-१९७६ २ )३-१-१९७७

३) ३१-१-१९७८ ४) १-३-१९७७


प्र.17) ४२ व्या घटना दुरुस्तीद्वारे उद्देश्यपत्रिकेमध्ये …….आणि …..शब्द जोडण्यात आले. (Asst मुख्य २०१४)

अ) समाजवादी ब) धर्मनिरपेक्ष

क) प्रजासत्ताक ड) राष्ट्राची एकता

१) अ,ब,क

२)अ,ब,ड

३) ब,क,ड

४) अ,क,ड


प्र.18). आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याने “विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि ………… यांचे स्वातंत्र्य दिले आहे. (Asst मुख्य २०१६)

१) व्यवसाय २) संघटना

३) पूजा ४) संचार


प्र.19) भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. (Asst. मुख्य २०१७)

अ) सरनामा हा राज्यघटनेचे अविभाज्य अंग आहे.

ब) सरनाम्यातील तरतूदी या न्यायालयाद्वारे अंमलात आणता येतात.

क) सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचे स्त्रोत म्हणून कार्य करू शकतो.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?

१) फक्त अ २) फक्त क

३) फक्त ब, क ४) अ, ब, क


प्र.20). भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकानुसार भारतात हे ‘प्रजासत्ताक’ आहे. प्रजासत्ताकाचा अर्थ कोणता? (ASOमुख्य २०१८).

अ) राज्यकर्ता वंशपरंपरागत नसतो.

ब) सार्वभौम सत्ता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये असते.

क) शासन प्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो.

ड) राष्ट्रप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो.

खाली दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा.

१) अ २) अ, ब, क

३) वरील सर्व ४) अ, ड


प्र.21). भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत शेवटी समाविष्ट केलेले शब्द कोणते? (Asst पूर्व २०१२)

अ) समाजवादी आ)धर्मनिरपेक्ष इ) सार्वभौम

ई)लोकशाही उ) गणराज्य ऊ)न्याय

ए) स्वातंत्र्य ऐ)समानता ओ)बंधुता

औ) एकात्मता

पर्यायी उत्तरे :

१) अ, ब, औ २) क, ड, ऊ

३) उ, ए, ऐ ४) अ, ड, ओ

PSI pre and Mains


प्र.22). भारताच्या राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेवर ……प्रभाव दिसतो. (PSI मुख्य २०१३)

अ) उद्देशपत्रिकेत ‘बंधुभाव’ या तत्वाचा समावेश केला.

ब) मूलभूत हक्कांद्वारे प्रतिष्ठा सुरक्षित केली आहे.

क) हे हक्क वादयोग्य (दाद मागता येणार) आहेत.

ड) गरजा आणि दुर्दशापासून नागरिकांना मुक्त ठेवण्यासाठी राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे समाविष्ट केली आहेत.

वर दिलेल्या विधानांपैकी कोणते/कोणती बरोबर आहेत ?

१) अ २) अ,ब

३) अ, ब, क ४) सर्व


प्र.23) ४२ व्या घटनादुरुस्तीनंतर भारताचे केलेले वर्णन असे : (PSI मुख्य २०१२)

१) सार्वभौम समाजवादी प्रजासत्ताक गणराज्य

२) सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य

३)सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य

४) प्रजासत्ताक गणराज्य


प्र.24) उद्देशपत्रिकेत बहाल केलेल्या ‘स्वातंत्र्यांचा’ बरोबर क्रम आहे. (PSI मुख्य २०१३)

१) अभिव्यक्ती, विचार, श्रध्दा, विश्वास, उपासना

२) विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा, उपासना

३) अभिव्यक्ती, विचार, विश्वास, उपासना, श्रध्दा

४) विचार, अभिव्यक्ती, उपासना, विश्वास, श्रध्दा


प्र.25) गटा बाहेरचा ओळखा : (PSI मुख्य २०१४)

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा, उपासना, सामाजिक

पर्यायी उत्तरे :

१) विचार २) श्रध्दा

३) उपासना ४) सामाजिक


प्र.26) उद्देशपत्रिकेची खालील वर्णने आणि विद्वान यांनी जुळणी करा: (PSI मुख्य २०१४)

अ) राजकीय कुंडली i) पंडीत ठाकुरदास भार्गव

ब) कल्याणकारी राज्याची

अचंबीत करणारी तत्वे ii)एम.व्ही.पायली

क) उत्कृष्ट गद्य-काव्य iii)के.एम.मुन्शी

ड) अशा प्रकारचा केलेला

एक सर्वोत्तम मसुदा iv)आचार्य.जे.बी.कृपलानी

अ   ब क   ड

१) iii iv i ii

२) i ii iii iv

३) ii i iv iii

४) iv iii ii i


प्र.27) खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? (PSI मुख्य २०१६)

१) सरनामा न्यायालयाद्वारा अंमलात आणता येत नाही…

२) राज्यघटनेस प्रस्थापित आणि विकसित करण्यायोग्य जी उद्दिष्ट्ये आह

ेत ती सरनाम्यातून व्यक्त होतात.

३) सरनाम्यातून राज्यघटनेने आपल्या अधिकाराचे स्त्रोत कोणाकडून प्राप्त केले आहे हे स्पष्ट होते.

४) आपल्या सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता आणि बंधूता ती आदर्श तत्वे रशियन राज्यक्रांती (१९१७) कडून घेतली आहेत.


प्र.28) भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे ? (PSI पूर्व २०१६)

१) स्वातंत्र्य २) समता

३) बंधुता ४) न्याय

STI Pre and Mains


प्र.29) खालील विधाने विचारात घ्या. (STI मुख्य २०१६)

अ) सरनाम्यामध्ये घटनाकारांची वास्ताविक उद्दिष्ट्ये आणि तत्वज्ञान यांचा समावेश आहे.

ब) बेरूबरी संघ खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले कर सरनाम्यातून राज्य घटनेचा साधारण हेतू दिसतो आणि म्हणून तो राज्य घटनेचा भाग आहे.

क) केशनावंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने बेरूबरी संघ खटल्यातील घेतलेला निर्णयच योग्य असल्याचे पुन्हा

प्रतिपादन केले.

ड) १९७६ च्या ४२ व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे सरनाम्यात-समाजवादी, सार्वभौम आणि अखंडता या तीन शब्दाचा समावेश करण्यात आला.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/त?

१) अ २) अ, ब, क

३) ड ४) अ, ब, क, ड


प्र.30) भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे? (STI पूर्व २०११)

१) स्वातंत्र्य २) समता

३) न्याय ४) बंधुभाव

प्र.31) खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?(STI पूर्व २०१५)

१) बेरुबरी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग असल्याचा निर्णय दिला होता.

२) केशवानंद भारतीय खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग नसल्याचा निर्णय दिला होता.

३) सरनाम्यामध्ये आतापर्यंत घटनादुरुस्तीद्वारे दोन वेळा बदल करण्यात आलेले आहेत.

४) वरील एकही नाही.


प्र.32) खालील विधाने लक्षात घ्या : (STI पूर्व २०१४)

अ) भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग असून त्यामध्ये ३६८ व्या कलमानुसार दुरुस्ती करता येते.

ब) भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका संविधानाचा भाग नाही आणि त्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही.

क) उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग आहे आणि त्यामध्ये संविधानाच्या “मौलिक संरचनेला’’ धक्क न लावता दुरुस्ती

करता येते.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

१) अ २) अ,ब

३) क ४) अ, क


प्र.33) भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय सम्मिलित झाले? (STI पूर्व २०१५)

अ) राष्ट्राची एकता

ब) राष्ट्राची अखंडता

पर्यायी उत्तरे

१) केवळ अ

२) केवळ ब

३)दोन्ही

४) दोन्ही प्रथमपासूनच सम्मिलित होतेAns : १) १, २) ३, ३) ३, ४) १, ५) ३, ६) ४, ७) २, ८) १, ९) १, १०) ४, ११) १, १२) ३, १३) ३, १४) ३, १५) १, १६) २, १७) २, १८) ३, १९) १, २०) ४, २१) १, २२) ४, २३) २, २४) २, २५) ४, २६) १, २७) ४, २८) ४, २९) १, ३०) ३, ३१) ४, ३२) ४, ३३) २

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 26 MAY 2024

1) राष्ट्रीय कागद विमान दिवस दरवर्षी 26 मे रोजी साजरा केला जातो. 2) व्हाईस अॅडमिरल गुरचरण सिंग यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे कमांडंट...