रक्त व रक्तगट

रक्तातील प्रतिजन (Antigens) आणि प्रतिद्रव्ये (Antibodies) या प्रथिनांच्या आधारावर रक्ताचे वेगवेगळे गट पाडले आहेत.

रक्तगटांचे A, B, AB, आणि O असे चार मुख्य प्रकार आहेत. त्यांपैकी A, B, आणि O यांचा शोध इ. स. १९०० साली लँडस्टेनर (Dr. Karl Landsteiner) यांनी लावला, तर उरलेला चौथा AB रक्तगट डीकास्टेलो आणि स्टर्ली (Decastellor And Sturli) यांनी १९०२ मध्ये लावला.

लँडस्टेनर यांना या शोधाबद्दल १९३० साली नोबेल पारितोषिक देण्यात आले.
लँडस्टेनर यांनी असे दाखवून दिले की, मानवाच्या तांबडया रक्तपेशींच्या पृष्ठभागावर प्रतिजन (Antigens) असतात, तर प्लाझ्मामध्ये प्रतिद्रव्ये (Antibodies) असतात.

प्रतिजन आणि प्रतिद्रव्ये यांची उपस्थिती किंवा अनुपस्थिती यावरून मानवी रक्ताचे गट
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
१) रक्तगट A – या रक्तगटाच्या व्यक्तीच्या तांबडया रक्तपेशींवर A प्रकारचे प्रतिजन असते व रक्तात b (anti B) प्रतिद्रव्य असते.

२) रक्तगट B – या रक्तगटाच्या व्यक्तीच्या तांबडया रक्तपेशींवर B प्रकारचे प्रतिजन असते व रक्तात a (anti A)  प्रतिद्रव्य असते.

३) रक्तगट AB – या रक्तगटाच्या व्यक्तीच्या तांबडया रक्तपेशींवर A आणि B हे दोन्ही प्रकारचे प्रतिजन असते, म्हणजेच a किंवा b या दोन्हींपैकी एकही प्रतिद्रव्ये असतात.

४) रक्तगट O – या रक्तगटाच्या व्यक्तीच्या तांबडया रक्तपेशींवर A आणि B या दोनींपैकी एकही प्रतिजन नसते, म्हणजेच a आणि b ही दोन्हीही प्रतिद्रव्ये असतात.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 26 जानेवारी 2024

◆ यंदा देशातील एकूण 1132 पोलिस, अग्नीशामक सेवा, ग्रहरक्षक कर्मचाऱ्यांना शौर्य/सेवा पदके जाहीर झाली आहेत. ◆ महाराष्ट्र पोलीस दलाला एकून 62 ...