◆ संस्थापक व स्थापना
● संस्थापक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
● स्थापना वर्ष : 15 ऑगस्ट 1936
● स्थापना स्थळ : मुंबई प्रांत
◆ उद्देश
● श्रमिक, शेतकरी, शेतमजूर व दलित वर्गाला सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय मिळवून देणे
◆ कार्य व लढे
● भूमिहीन शेतमजुरांना जमीन मिळवून देण्यासाठी संघर्ष
● कामगारांसाठी चांगले कायदे व सुविधा यासाठी आंदोलन
● ट्रेड डिस्प्युट बिलविरोधात आंदोलन
● 7 नोव्हेंबर 1938 रोजी लाक्षणिक संप
◆ निवडणूक यश
● 1936 च्या प्रांतीय निवडणुकीत 17 पैकी 15 जागा जिंकल्या
● विधानसभेत प्रभावी भूमिका बजावली
◆ विधिमंडळातील भूमिका (1937–1939)
● विविध विधेयके मांडली
● कामगार व शेतकरी हिताचे मुद्दे प्रभावीपणे उपस्थित
◆ जाहीरनामा
● पक्षाचा जाहीरनामा प्रथम ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या दैनिकात प्रकाशित
◆ पुढील रूपांतरण
● 1942 मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाचे शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनमध्ये रूपांतर
◆ ऐतिहासिक महत्त्व
● दलित व कामगार वर्गाला स्वतंत्र राजकीय व्यासपीठ
● जातीय भेदभाव व शोषणाविरुद्ध संघटित लढा
No comments:
Post a Comment