Saturday 28 September 2019

अरुणाचलप्रदेशात पर्यटन प्रकल्प

केंद्र सरकार प्रणीत ‘स्वदेश दर्शन’ योजनेतंर्गत मुख्यमंत्री पेमा खांडू व राज्य पर्यटनमंत्री के.जे.अल्फोन्स यांनी अरुणाचल प्रदेश राज्यातील दोन ईशान्य पर्यटन प्रकल्पांचे उद्‌घाटन केले.

या दोन्ही प्रकल्पांना केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने वर्ष २०१५ मध्येच मंजुरी दिली होती.

🔰 भालुकपोंग-बोम्दील-तवांग प्रकल्प -
          या प्रकल्पात गृहनिर्माण, शौचालय बांधणी यांसारखी पायाभूत कामे करण्यात आली आहेत.

आता सोरंग माठ, त्यात त्सो व सेला सरोवर, थीन्ग्बू व ग्रेन्खा गरम पाण्याचे झरे यासारख्या ठिकाणी विविध सुविधा करण्यात येणार आहेत.

🔰नाफरा-संगदूपोटा-जीरो-येम्चा प्रकल्प -
          या प्रकल्पाअंतर्गत पर्यटनास अनुकूल असणाऱ्या विविध विविध नगरांमध्ये हस्तकला बाजार, गिर्यारोहण उपक्रम, मोठमोठी वाहनतळे, हेलिपॅड अशा सुविधा देण्यात येणार आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

जगाच्या भुगोलाबद्दल थोडी माहिती

➡️ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो. ➡️ भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. ➡️ भार...