Saturday 29 February 2020

OYO'चा रितेश अग्रवाल ठरला जगातील दुसरा सेल्फ मेड बिलेनिअर

- ओयो हॉटेल्सचा 24 वर्षीय संस्थापक रितेश अग्रवाल जगातील दुसरा सर्वात तरूण अब्जाधीश ठरला आहे.
- हुरून ग्लोबर रिच 2020 च्या यादीनुसार, वयाच्या 24 व्या वर्षी रितेशची संपत्ती तब्बल 7,800 कोटी रुपये आहे. अग्रवालच्या आधी 22 वर्षीय कॉस्मेटिक क्वीन कायली जेनेर असून, तिची संपत्ती 1.1 मिलियन डॉलर एवढी आहे.
- 2013 साली सुरू झालेली ओयो हॉटेल्स हे भारतातील सर्वात मोठी हॉटेल चेन नेटवर्क आहे. या कंपनीचे मूल्य तब्बल 10 मिलियन डॉलर आहे. ओयो हॉटेल्सचे नेटवर्क यूएस आणि यूरोपमध्ये देखील आहे. याशिवाय ओयो हॉटेल्स चीनमधील दुसरे सर्वात मोठी हॉटेल चेन आहे.
रितेश कॉलेज ड्रॉपआउट असून, त्याने शिक्षण घेतलेले नाही. तो 40 वर्षांखालील सर्वात श्रींमत सेल्फ मेड अब्जाधीश आहे.

- झेरोधचे फाउंडर नितिन कामत आणि निखिल कामत हे देखील सेल्फ मेड अब्जाधीश आहेत. त्यानंतर फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन आणि बिनी बन्सल यांची संपत्ती 1-1 अब्ज डॉलर आहे व बायजूचे संस्थापक रविंद्रन फॅमिलीची संपत्ती देखील 1.4 बिलियन डॉलर आहे.

- युवा आणि श्रींमत लोकांच्या 40 वर्षांखालील यादीत 90 जणांचा समावेश आहे. यातील 54 जण स्वतःच्या हिंमतीवर अब्जाधीश झाले आहेत, तर 36 जणांना वारसा हक्काने संपत्ती मिळाली आहे. या यादीमध्ये अमेरिका आणि चीनमधील प्रत्येकी 25 युवा अब्जाधीशांचा समावेश आहे.

- भारतात 2020 मध्ये 137 अब्जाधीश असून, मागील वर्षीच्या तुलनेत 33 जणांचा यात समावेश झाला आहे. यामध्ये 67 बिलियन डॉलर संपत्तीसह रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी पहिल्या स्थानावर आहेत. मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रींमत तर जगातील नववे सर्वात श्रींमत व्यक्ती आहेत.

देशात  सर्वाधिक
- 50 अब्जाधीश मुंबईमध्ये राहतात, बंगळुरू 17, अहमदाबाद 12 आणि हैदराबादमध्ये 7 अब्जाधीश राहतात

No comments:

Post a Comment

Latest post

भारतात मुस्लिम सत्तेची स्थापना

👉 1. महंमद गझनवी :- अकराव्या शतकापासून भारतावर तुर्काची आक्रमणे होण्यास सुरुवात झाली. गझनीचा तुर्क सत्ताधीश सबक्तगीन याने भारतावर स्वार्‍या...