Friday 17 July 2020

‘इंडियन गॅस एक्सचेंज’ (IGX): भारतातला पहिला राष्ट्रव्यापी ऑनलाइन वितरण-व्यापार सुविधा मंच.


🔶पेट्रोलियम व नैसर्गिक वायू तसेच पोलाद मंत्री धमेंद्र प्रधान यांच्या हस्ते ‘इंडियन गॅस एक्सचेंज’ (IGX) या नावाने भारतातल्या पहिल्या राष्ट्रव्यापी ऑनलाइन वितरण-व्यापार सुविधा मंचाच्या कार्याला सुरुवात करण्यात आली.

🔥मुख्य बाबी

🔶‘इंडियन गॅस एक्सचेंज’ (IGX) याच्या माध्यमातून नैसर्गिक वायूच्या वितरणासाठी व्यापार मंच म्हणून कार्य करण्यात येणार आहे.
भारतामध्ये ऊर्जा बाजार मंचाचे पूर्ण स्वामित्व असलेली ‘इंडियन एनर्जी एक्सचेंज’ (IEX) या कंपनीची उपकंपनी म्हणून IGX कार्यरत राहणार आहे.नैसर्गिक वायू बाजारपेठेतल्या सर्व सहभागींना प्रमाणित मानकांनुसार व्यापार करण्यासाठी ही नवीन कंपनी समर्थ असणार आहे.

🔶या मंचामुळे ग्राहकांना कोणत्याही समस्येविना, अडथळ्याविना व्यापार करणे शक्य होणार आहे.IGX याचे कामकाज पूर्णपणे संकेतस्थळ-आधारित मंचच्या मदतीने करण्यात येणार आहे.

🔥IGXचे भविष्यकालिन फायदे🔥

🔶नैसर्गिक वायू व्यापारासाठी सुरू केलेल्या या नवीन इलेक्ट्रॉनिक मंचामुळे भारतातल्या ऊर्जा क्षेत्रामध्ये एका नवीन अध्यायाला प्रारंभ झाला. यामुळे नैसर्गिक वायूसाठी मुक्त बाजार मूल्य निर्धारण करण्याच्या दिशेने देशाला पुढे पावले टाकण्यासाठी मदत मिळणार आहे.

🔶बाजार संचलित मूल्य निश्चिती प्रणाली असल्यामुळे इंडिया गॅस एक्सचेंज (IGX) नैसर्गिक वायूसाठी मुक्त बाजार साकार करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावू शकणार आहे.

🔶पेट्रोलियम व नैसर्गिक वायू नियामक मंडळ (PNGRB) देशातल्या सर्व भागामध्ये नैसर्गिक गॅस योग्य दरामध्ये उपलब्ध व्हावा यासाठी दरांच्या सुसूत्रीकरणावर भर दिला जाणार आहे. या मंचमुळे मुक्त बाजारपेठेमध्ये ग्राहकांचा विचार मूल्यनिर्धारण करताना करणे शक्य होणार आहे. IGX बाजारपेठेतले चढ-उतार लक्षात घेवून किंमत निश्चित करू शकणार आहे.

🔶IGXच्या माध्यमातून LNG टर्मिनल, गॅस पाइपलाईन, CGD पायाभूत सुविधा आणि बाजारपेठेचा कल पाहून किंमत यंत्रणा यासंबंधी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार, अशी अपेक्षा आहे.

🔶भारताची अर्थव्यवस्था LNG आधारित बनवण्यासाठी हाती घेतलेली कार्ये देशाकडे लवकरच 50 MMT एवढी LNG टर्मिनल क्षमता असणार आहे.

🔶देशाने कतार, ऑस्ट्रेलिया, रशिया आणि अमेरिका यांच्यासारख्या अनेक देशांबरोबर दीर्घकालीन LNG करार केले आहेत. तसेच मोझांबिक, रशिया आणि इतर देशांमध्ये अतिशय महत्वाच्या मालमत्तांमध्ये गुंतवणूकही केली आहे.

🔶देशामध्ये LNG विषयक पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी ऊर्जा गंगा, पूर्व भारत ग्रिड, ईशान्येकडे इंद्रधनुष प्रकल्प, धमरा-दहेज गॅसवाहिनी प्रकल्प, कोळसा गॅसीफिकेशन प्रकल्प आणि CBM कार्यशैली यासारख्या योजना सध्या कार्यरत आहेत.

🔶येत्या काही वर्षामध्ये देशात 30,000 किलोमीटरपेक्षा जास्त पाइपलाईन तयार असणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 23 एप्रिल 2024

◆ युनायटेड स्टेट्स 2023 मध्ये सर्वाधिक लष्करी खर्च करणारा देश बनला आहे. ◆ केरळमध्ये सर्वात मोठा मंदिर उत्सव ‘थ्रिसूर पूरम 2024’ साजरा करण्...