Tuesday 3 March 2020

विराटने अव्वल स्थान गमावलं.

🔰न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन कसोटी मालिकेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. दोन्ही डावांमध्ये भारतीय फलंदाज न्यूझीलंडच्या माऱ्याचा सामना करु शकले नाही. एका क्षणाला भारतावर डावाने पराभव स्विकारण्याची वेळ येते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

🔰मात्र ऋषभ पंतने ही नामुष्की टाळली. विराट कोहलीही पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही डावांत सपशेल अपयशी ठरला.

🔰तर या खराब कामगिरीचा विराटला आयसीसी क्रमवारीत फटका बसलेला असून त्याने आपलं अव्वल स्थान गमावलेलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथने आता अव्वल स्थान मिळवलं आहे.

🔰तसेच मात्र विराटव्यतिरीक्त आणखी 3 भारतीय फलंदाजांनी या यादीमध्ये आपलं स्थान मिळवलं आहे. दोन्ही डावांमध्ये न्यूझीलंडच्या गोलंदाजांना नेटाने सामना करणाऱ्या मयांक अग्रवाल आणि अजिंक्य रहाणे यांना बढती मिळाली आहे.

🔰मयांक 12 व्या स्थानावरुन दहाव्या स्थानावर, तर अजिंक्य नवव्या स्थानावरुन आठव्या स्थानावर आला आहे. चेतेश्वर पुजाराच्या क्रमवारीत घसरण झाली असून तो सातव्या स्थानावरुन नवव्या स्थानावर घसरला आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 13 JUNE 2024

1) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जाहीर केलेल्या 'ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स' मध्ये भारत 129 व्या स्थानावर पोहोचला आहे. 2) दरवर्षी 13 जून रो...