असहकार आणि खिलाफत आंदोलन

·         गांधीजींनी व काँग्रेसने असहकाराचे अहिंसक आंदोलन सप्टेंबर 1920 मध्ये सुरु केले.

·         पंजाबात व खिलाफतीबद्दल जो अन्याय झाला होता तो दूर होऊन स्वराज्य मिळेपर्यंत ते चालू राहावयाचे होते.

·         गांधीजींनी एका वर्षात स्वराज्य अशी घोषणा केली. सरकारमान्य शाळा महाविद्यालये, कोर्टकचेर्‍या, विधिमंडळे व परदेशी कापडहयांवर बहिष्कार घालण्याचा व सरकारने दिलेल्या पदव्या किताबांचा त्याग करण्याचा जनतेला आदेश देण्यात आला.

·         नंतर सरकारी नोकर्‍याचे राजिनामे आणि करबंदी सुरु करुन या आंदोलनाला जनतेच्या सत्याग्रहाचे स्वरुप देण्याचा कार्या होता. राष्ट्रीय शाळा व महाविद्यालये सुरु करण्यात आली. स्वहस्ते सूत कातून खादी तयार करण्याचे, अस्पृश्यता न पाळण्याचे व हिंदू मुस्लिम ऐक्याचे संवर्धन करुन ते टिकविण्याचे जनतेला आदेश देण्यात आले. भाषिक आधारावर प्रांतिक काँग्रेस समित्या संचलित करण्यात आल्या.

·         काँग्रेस संघटना अगदी खेडयांपर्यंत पोहोचली व तिच्या सभासदत्वाचे वार्षिक शुल्क केवळ चार आणे ठेवण्यात आले. ग्रामीण व शहरी भागांतील गरीब जनतेलाही सभासद होता यावे हा त्यामागचा उद्देश होता.

·         या पहिल्या जनआंदोलनास 1920 ते 1922 दरम्यान अभूतपर्व स्वरुप प्राप्त झाले. लाखो विद्याथ्र्यांनी शाळा महाविद्यालये सोडली. शेकडो वकिलांनी आपली प्रॅक्टिस सोडून दिली.

·         परदेशी कापडावरील बहिष्कार हे एक जनआंदोलन बनले व परदेशी कापडाच्या हजारो होळयांनी भारतीय नभोमंडळ उजळून गेले.

·         परदेशी कापड विकणार्‍या व दारुच्या दुकानांवरील निरोधनाचा कार्याही विशेष यशस्वी ठरला.

·         या आंदोलनात अनेक विभागांत कामगार आणि शेतकरी आघाडीवर होते. तरीही गांधीजी संतुष्ट नव्हते.

·         ता. 5 फेब्रुवारीस चौरीचौराची घटना घडली.

·         तीन हजार शेतकर्‍यांच्या एका काँग्रेस मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला व त्यचा सूड म्हणून प्रक्षुब्ध जमावाने पालिसचौकीच पेटवून दिली. त्यांत 22 पोलिस ठार झाले.

·         गांधीजींनी हया प्रकाराची विशेष गांभीर्याने दखल घेतली व अहिंसात्मक चळवळीची जनतेला अद्याप योग्य शिकवण मिळाली नाही, असे वाटून त्यांनी 12 फेब्रुवारी 1922 रोजी हे आंदोलन मागे घेतले. मात्र या चळवळीचे परिणाम दीर्घकाळ टिकून राहणारे होते.

(1) त्यामुळे प्रथमच लक्षावधी शेतकरी व नागरी विभागांतील गरीब जनता राष्ट्रीय चळवळीच्या प्रवाहात आली. किंबहुना सार्‍या भारतीय जनतेलाच आता अस्मितेची जाणीव झाली. त्यात शेतकरी, कामगार, कारागीर, ददुकानदार, व्यापारी, डॉक्टर, इतर व्यावसायिक व कचेर्‍यांत काम करणार्‍या नोकरवर्गाचाही समावेश होता. स्त्रियांही या आंदोलनाकडे आकर्षित झाल्या. देशाच्या अगदी दूरवरच्या कोपर्‍यापर्यंत ही चळवळ फैलावली. किंबहुना जनतेची लढयाची प्रवृज्ञ्ल्त्;ाी आणि स्वार्थत्यागाची भावना यावरच गांधीजींनी आपले सर्व राजकारण आधारले होते. त्यांनी जनतेला राष्ट्रीय संग्रामाच्या आघाडीवर आणले व त्यांचे जनआंदोलनात रुपांतर केले.

(2) भारतीय जनता आता निर्भय बनली. आता ब्रिटिश साम्राज्यशाहीची तिला भीती वाटेनाशी झाली. नेहरुनी नंतर म्हटल्याप्रमाणे गांधीजींनी त्यांच्यातील पौरुषत्व जागृत केले. सार्‍या देशाच्या बाबतीत असेच घडले.

(3) या संदर्भात असे ध्यानात घ्यावयास हवे की अहिंसा हे दुबळया व भेकडांचे शस्त्र आहे. असे गांधीजी मुळीच मानीत नसत. अगदी खंबीरवृज्ञ्ल्त्;ाीची माणसेच त्याचा उपयोग करु शकत. भेकडपणापेक्षा मला हिंसाचार परवडेल, असे गांधीजींनी पुन: पुन्हा सांगितले आहे. १९२० मध्येच त्यांनी म्हटले होते की, ज्ञ्थ्ुेत्;भिरुता की हिंसा एवढाच पर्याय असेल तर खुशाल हिंसाचाराचा अवलंब करा असाच मी सल्ला देईन, भेकड वृत्तीवरने असहाय्यपणे आपला अवमान निमूटपणे पाहात राहण्यापेक्षा आपल्या मानाच्या रक्षणासाठी हिंदी जनतेने हिंसेचा अवलंब केला तरी मला चालेल.

·         असहकार चळवळीचा अत्यंत महत्वाचा परिणाम म्हणजे हिंदी जनतेचा आत्मविश्र्वास आणि स्वाभिमान फार मोठया प्रमाणात वाढला.

·         आता भारतीय जनतेचे साम्राज्यशाहीशी युध्दच सुरु झाले होते.

·         एखाद्या लढाईत तात्पुरता पराभव पत्करावा लागला तरी आपल्या ध्येयाकडील वाटचालीपासून आता कोणीही तिला विचलित करु शकणार नव्हते.

·         ता. 23 फेब्रुवारी 1922 ला चळवळ मागे घेताना गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे, ब्रिटिश जनतेला जाणीव करुन देण्यास हीच योग्य वेळ आहे.

·         1920 मध्ये जो संग्राम सुरु झाला तो आता शेवटाला जाईपर्यंत चालू राहणार आहे.

·         मग तो एक महिना वा एक वर्ष किंवा कित्येक महिने वा कित्येक वर्षे चालो अथवा स्वातंत्र्ययुध्दाच्या दिवसांत ब्रिटिशांच्या प्रतिनिधींनी जो वर्णनातील धुमाकूळ घातला तसा ते नव्या जोमाने घालोत वा न घालोत, संग्राम चालूच राहील.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नसंच

1.कोणत्या आशियाई देशाने लिथियम आणि ग्रेफाइटसह 20 गंभीर खनिज ब्लॉक्सचा ई-लिलाव सुरू केला आहे? [अ] श्रीलंका [ब] इंडोनेशिया [क] भारत [डी] बांगल...