Tuesday 23 January 2024

चालू घडामोडी :- 22 जानेवारी 2024

◆ असोसिएशन ऑफ स्टेट ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग या केंद्रीय संस्थेमार्फत देशात प्रथमच 24 जानेवारी हा दिवस चालक दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

◆ महाराष्ट्र राज्य पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ग्रॉस एनरोलमेंट रेशो GER मध्ये देशांत 8व्या क्रमांकावर आहे.

◆ भारतात उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण सर्वाधिक चंदीगड येथे आहे.

◆ LIC ने शुभारंभ केलेल्या जीवन धारा-2  पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी 20 वर्षे वयाची अट आहे.

◆ इंडिया ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत "सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी" या भारताच्या बॅडमिंटन जोडीने उपविजेतेपद पटकावले आहे.

◆ इंडीया ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद चीन या देशाच्या 'शा युकी' ने पटकावले.

◆ बांबू लागवडीसाठी टास्क फोर्स स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे.

◆ अयोध्या येथे श्री रामाच्या प्राण प्रतिष्ठा निमित्ताने 19 लाख दिवे लावण्यात येणार आहेत.

◆ टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा 2024 मध्ये पहिले तीन क्रमांक इथोपिया या देशाच्या धावपटूंनी पटकावले.

◆ मुंबई मध्ये आयोजित टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा 2024 चे हे 19वे वर्ष आहे.

◆ भारतातील पहिला ऑटो रोबोटिक उत्पादन प्रकल्प सुरत येथे स्थापन करण्यात आला आहे.

◆ केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी देशातून वस्तू व सेवांची निर्यातीत 0.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

◆ प्रजासत्ताक दिनानिमित्त देशात पर्यटन मंत्रालय व्दारे "भारत पर्व" हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

◆ केंद्रीय पर्यटन मंत्रालया द्वारा 23 ते 31 जानेवारी कालावधीत देशात भारत पर्व या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

◆ 50 वा कुर्बी युवा महोत्सव आसाम राज्यात आयोजित करण्यात आला होता.

◆ अयोध्या येथे उभारण्यात आलेले राम मंदिर हे वास्तुकलेच्या "नगाडा" शैलीतील आहे.

◆ अयोध्या मध्ये राम मंदिरा मध्ये स्थापन करण्यात येणारी रामाची मूर्ती बनविणारे अरुण योगीराज कर्नाटक राज्याशी संबधित आहेत.

◆ अयोध्या येथे उभारण्यात आलेल्या श्री राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारी 2024 या दिवशी होत आहे.

◆ 2024 या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाची थीम "विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी" ही आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

No comments:

Post a Comment

Latest post

काकोरी कट घटना

( काकोरी ट्रेन लुट म्हणूनही ओळखली जाते) ही ब्रिटिश वसाहतवादी शासनाविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण घटना होती.  - दिना...