Monday, 28 November 2022

चवदार तळे सत्याग्रह

▪ महाड सत्याग्रह हा 20 मार्च 1927 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील ‘महाड’ येथील चवदार तळ्यावर अस्पृश्यांना पाणी घेता यावे म्हणून केला सत्याग्रह होता.

▪ चवदार तळ्याचा सत्याग्रह किंवा महाडचा मुक्तिसंग्राम म्हणून ही ओळखले जाते. यामुळेच हा दिवस सामाजिक सबलीकरण दिन म्हणून साजरा केला जातो.

▪ हिंदू धर्मातील जातीव्यवस्थेमुळे उच्चजातीय अस्पृश्यांना हिंदूंपासून वेगळे वागवत असत.अस्पृश्यांना पाण्याच्या मुख्य स्रोतामधून पाणी घेण्यास परवानगी नव्हती.

▪ मुंबई कायदे मंडळाने 1923 साली एक महत्वपूर्ण निर्णय पारित करत सार्वजनिक पाण्याच्या जागा, विहिरी, धर्मशाळा, शाळा, न्यायालये, यांमध्ये अस्पृश्यांनाही परवानगी आहे असे म्हटले होते.

▪ महाडच्या नगरपालिकेनेही जानेवारी 1924 साली या कायद्याची अंमलबजावणी करणारा निर्णय पारित केला परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालीच नाही.

▪ अखेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सहकाऱ्यांशी विचारविनिमय करून  19 व 20 मार्च 1927 रोजी महाड येथे सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला.

▪ याच अनुषंगाने 20 मार्चला महाड चवदार तळ्याचे पाणी पिऊन समतेचा हक्क सिद्ध करायचा या निर्धाराने सर्वजण तळ्याकडे गेले आणि आधी बाबासाहेब आणि नंतर सर्वांनी पाणी प्राशन करून आपला समतेचा संदेश दिला.

▪ सत्याग्रहाच्यावेळी अनंतराव विनायक चित्रे, सुरेंद्र गोविंद टिपणीस, गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे, कमलाकांत चित्रे यांचे चांगले सहकार्य लाभले.

▪ या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष संभाजी तुकाराम गायकवाड, सुभेदार विश्राम गंगाराम सवादकर, रामचंद्र बाबाजी मोरे, शिवराम गोपाळ जाधव, केशवराव आणि गोविंद आद्रेकर आदी कार्यकर्त्यांचा सत्याग्रहात  महत्वाचा सहभाग होता.

No comments:

Post a Comment

Latest post

Daily Top 10 News : 21 March 2023

1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 मार्च 2023 रोजी नवी दिल्ली येथे ग्लोबल मिलेट्स (श्री अण्णा) परिषदेचे उद्घाटन केले. ते याप्रसंगी उपस्थितां...