Monday 28 November 2022

रासायनिक गुणधर्मानुसार अग्निजन्य खडकांचे प्रकार :



🔘आम्लधर्मीय खडक : 

आम्लधर्मीय अग्निजन्य खडकात सिलिकाचे प्रमाण ८० टक्क्य़ांपर्यंत असते. अ‍ॅल्युमिनियम, मॅग्नेशियम व चुना यांचे प्रमाण २० टक्क्य़ांपर्यंत असते. हे खडक वजनाने हलके असून त्यांचा रंग फिकट पिवळा असतो. घट्ट लाव्हारसापासून त्याची निर्मिती होत असल्याने या खडकांची उंची जास्त, पण विस्तार कमी असतो. ग्रॅनाइट हे या प्रकारच्या खडकांचे उत्तम उदाहरण आहे.


🔘अल्कधर्मीय खडक : 

या प्रकारच्या अग्निजन्य खडकात ४०% सिलिका व ४०% मॅग्नेशियमचे प्रमाण असते. आयर्न ऑक्साइड व इतर पदार्थ २०% असतात. या खडकाचा रंग काळा असून त्याची झीज लवकर होते. बेसॉल्ट हे याचे उदाहरण आहे. पातळ लाव्हारसापासून हे खडक तयार होत असल्याने भूपृष्ठावर दूरवर पसरलेले असतात.


🔶अग्निजन्य खडकांचे गुणधर्म :

* अग्निजन्य खडकातील स्फटिक गोलाकार नसतात. निरनिराळ्या आकारांचे स्फटिक अनियमित स्वरूपाचे, एकसंध झालेले असतात.

* हे खडक अवाढव्य असून कठीण असतात. त्यांच्यामध्ये थर आढळत नाहीत, परंतु जोड असतात.

* या खडकांमध्ये छिद्र नसते. त्यात पाणी मुरत नाही.

* अग्निजन्य खडकांमध्ये प्राण्यांचे किंवा वनस्पतींचे अवशेष सापडत नाहीत, परंतु अनेक प्रकारची खनिजे आढळतात.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...