Thursday 14 March 2024

वनांचे प्रकार


🔸भारतीय वनांचे पुढीलप्रमाणे पाच प्रकारांत वर्गीकरण केले जाते.

1)उष्णप्रदेशीय सदाहरित वने:

--250 से.मी पेक्षा अधिक पावसाच्या भागात सदाहरित वने आढळतात.

◾️प्रमुख वृक्ष:महोगणी,रोजवूड,बिशपवुड,रबर,आंबा,जांभूळ,शिसव, साल,हिरडा,बांबू,वेत.

🔺उपयोग:इमारती,जहाज बांधणी इत्यादीसाठी.



2)उष्ण परदेशीय पानझडी वने:

--'मोसमी वने' या नावेही ओळखली जाणारी हि वने 200 से.मी.पर्यंत पाऊस असणाऱ्या मधप्रदेश,बिहार,ओरिसा,महाराष्ट्र या राज्यात आढळतात.

▪️उष्ण कोरड्या हवेत बाष्पीभवन टाळण्यासाठी हे वृक्ष पाने गाळतात.

◾️प्रमुख वृक्ष:साल,साग,पळस, सिसंम, खैर,अर्जुन,मोह,पिंपळ,अंजन,धावडा,चंदन,किंजल,कुंभी,बांबू.

🔸उपयोग: जहाजबांधणी,रेल्वे डबे,खेळणी इत्यादींसाठी.


3)उष्ण प्रदेशीय काटेरी वने व झुडपे:

--50 ते 75 से.मी.पावसाच्या प्रदेशात कच्छ, सौराष्ट्र,राजस्थान,पंजाब,हरियाणा,आणि महाराष्ट्रातील कमी पावसाच्या प्रदेशात हि वने आढळतात.

◾️प्रमुख वृक्ष: बाभूळ,सालाई, निवडुंग,हिवर, बोर,केतकी,नागफणी,यासारखी काटेरि झुडपे या वनात आढळतात.


4)पर्वतीय वने:

--120से.मी. पेक्षा अधिक पावसाच्या काश्मीर,उत्तराखंड,हिमाचल प्रदेश या राज्यांच्या उंच पर्वतीय भागात हि वने आढळतात.

🔸प्रमुख वृक्ष: पाइन,ओक,चेस्टनट, स्पृस,देवदार,फर, पोपलेर, बर्रच, मॅपल.

🔸उपयोग: लाकूड मऊ व वजनाने हलके असल्याने त्यापासून आग्कड्या, कागदाचा लगदा,कलाकुसरीच्या वस्तू बनविल्या जातात.


5)समुद्रकाठची वने: 

--किनाऱ्यावरील त्रिभुज प्रदेशात हि वने दाटीवाटीने आढळतात.

--पश्चिम बंगालमधील सुंदरबन,ओडिशा,आंध्रप्रदेश,तामिळनाडू,या राज्यांच्या किनारी प्रदेशात हे वृक्ष वाढतात.

🔸उपयोग:

1)बिहार,ओडिशा,मध्य प्रदेश या राज्यातू  लाखेचे उत्पादन होते.

2)लाखेचा उपयोग औषधे,रंग,ग्रोमोफोन रेकॉर्ड ,बांगड्यानिर्मिती अशा अनेक उदोगात केला जातो.

3)बाभळीची साल कातडी कमावण्यासाठी व औषधे बनविण्यासाठी उपयुक्त असते.




          🌷वन्य प्राणी🌷


➡️आसाम,केरळ,कर्नाटकच्या जंगलात हत्ती आढळतात.

➡️कच्छच्या रन: चिंकारा,काळवीट,जंगली गाढव,उंट.

➡️राजस्थानचे वाळवंट: लाल कोल्हा,जंगली मांजर.

➡️राजस्थानच्या मैदानात भारतीय रानकोंबडा, खरुची,गिधाड,गरुड,बहिरी ससाणा,मोर हे पक्षी आढळतात.

➡️पश्चिम बंगाल व आसाममध्ये - एकशिंगी गेंडा.

➡️सौराष्ट्रातील जुनागड गिरच्या रानात: सिंह.

➡️प.बंगालमधील सुंदरबानंत : वाघ हे प्राणी आढळतात.


No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...