Thursday 17 September 2020

आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासासाठी भारताचा अमेरिका, फ्रान्स, जर्मनी यांच्यासोबत ‘एअर बबल’ करार

कोविड-19 महामारीमुळे बंद पडलेल्या आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक सेवेला काही निवडक देशांसाठी पुन्हा चालू करण्याच्या उद्देशाने भारताने संयुक्त राज्ये अमेरिका, फ्रान्स, जर्मनी या देशांच्या सोबत द्विपक्षीय ‘एअर बबल’ करार केले आहेत.


🔸महामारीमुळे बंद पडलेल्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा क्षेत्राला आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे लवकरात लवकर विमान सेवा सुरु कारण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनीबरोबर करार करून या देशांमध्ये विमान सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.


ठळक बाबी


🔸टाळेबंदीनंतर प्रथमच भारत-अमेरिका विमानसेवा सुरु झाली आहे. 18 जुलैपासून फ्रान्ससोबत हवाई सेवा सुरू होणार आहे.


🔸‘एअर बबल’ करारानुसार ठरलेल्या कालावधीतच निश्चित विमानसेवा पूर्ण करावयाच्या असतात. 


🔸अमेरिका आणि भारत यांच्यात 17 ते 31 जुलै 2020 या कालावधीत 18 विमानांची उड्डाणे निश्चित झाली आहेत. 


🔸ही उड्डाणे दिल्ली ते न्यूयॉर्क आणि दिल्ली ते सॅन फ्रॅन्सिस्को दरम्यान होतील. यासह एअर फ्रान्स दिल्ली, मुंबई, बंगळुरू पॅरिस दरम्यान 18 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत 28 विमानाचे उड्डाण करणार आहे.


🔸तसेच ब्रिटनसोबत हवाईसेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

संयुक्त गट "ब" आणि "क" पूर्व परीक्षा सराव चाचणी क्र.

 क्रिकेट बाँल ही खालीलपैकी कोणत्या फळाची जात आहे. ? ⚪️ दराक्ष  ⚪️ मोसंबी  ⚪️ डाळिंब ⚫️ चिकू ☑️ महाराष्ट्रात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने...