Sunday 8 March 2020

जनऔषधी दिन 2020

‘प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना’ याच्या कामगिरीचा सन्मान करण्याच्या उद्देशाने दिनांक 7 जानेवारी 2020 रोजी भारतात ‘जनऔषधी दिन’ साजरा करण्यात आला.

प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना (PMBJP)...

भारत सरकारच्या औषधी (फार्मास्यूटिकल) विभागाने सुरू केलेली एक मोहीम आहे. “सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण औषधे स्वस्त दरात उपलब्ध व्हावीत” या उद्देशाने 2008 साली ही योजना “जनऔषधी योजना” या नावाने सादर करण्यात आली.

सप्टेंबर 2015 मध्ये योजनेचे रूपांतर 'प्रधानमंत्री जन औषधी योजना' म्हणून केले गेले. नोव्हेंबर 2016 मध्ये या योजनेचा विस्तार करण्यासाठी नाव पुन्हा बदलून “प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना” (PMBJP) ठेवले.

या योजनेच्या अंतर्गत जन औषधी केंद्रांची देशभरात ठिकठिकाणी स्थापना करण्यात आली. त्या केंद्रांवर जेनेरिक औषधांची विक्री केली जाते.

ही केंद्रे जेनेरिक औषधांबद्दल जागृती निर्माण करतात जी नामांकित औषधे नाहीत, मात्र तितकेच सुरक्षित आहेत. त्या नामांकित औषधांपेक्षा खूपच स्वस्त दरात उपलब्ध होतात.

आज भारतामध्ये 6200 हून अधिक केंद्रे आहेत. ही केंद्रे देशातल्या 700 जिल्ह्यांमध्ये आहेत, ज्यामुळे ती जगातली सर्वात मोठी किरकोळ औषधालय शृंखला ठरते.

2019-20 या वर्षात या दुकानांमध्ये झालेली विक्री ही जवळपास 390 कोटी रुपये आहे आणि ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या 2200 कोटी रुपयांची बचत झाली.पहिले “जनऔषधी केंद्र” 25 नोव्हेंबर 2008 रोजी अमृतसर (पंजाब) या शहरात उघडले गेले.

No comments:

Post a Comment

Latest post

भारतात मुस्लिम सत्तेची स्थापना

👉 1. महंमद गझनवी :- अकराव्या शतकापासून भारतावर तुर्काची आक्रमणे होण्यास सुरुवात झाली. गझनीचा तुर्क सत्ताधीश सबक्तगीन याने भारतावर स्वार्‍या...