Sunday 8 March 2020

जागतिक महिला दिन 8 मार्च

◾️जगभरात ८ मार्चला मोठ्या उत्साहात जागतिक महिला दिन साजरा केला जातो.

◾️ महिलांच्याप्रती आदर, सन्मान व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

🔰 जगातील पहिला महिला दिन

◾️सर्वात पहिल्यांदा १९०९ मध्ये 'जागतिक महिला दिन' साजरा केला गेला.

◾️मात्र १९७५ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने एका थीमसह महिला दिन साजरा करण्याची प्रथा सुरू केली. तेव्हापासून याला अधिकृत जागतिक मान्यता मिळाली.

◾️महिला दिनाची पहिली थीम 'सेलिब्रेटींग द पास्ट, प्लॅनिंग फॉर द फ्युचर' अशी होती

◾️ इतिहासात १९७५ हे साल 'रेड लेटर इअर' म्हणून पाहिले जाते. कारण याच वर्षी युनायटेड नेशनने 'जागतिक महिला दिना'ला अधिकृत मान्यता दिली. त्यानंतर ८ मार्चला जागतिक महिला दिन साजरा होऊ लागला. त्यानंतर १९७६ ते १९८५ हे महिलांचे दशक म्हणून ओळखले जावू लागले.

🔰मार्च हा महिना 'वुमन्स हिस्ट्री मंथ

◾️अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी २०११ मध्ये मार्च हा महिना 'वुमन्स हिस्ट्री मंथ' (Women's History Month) असल्याचे घोषित केले.

🔰जागतिक महिला दिन आणि जांभळा रंगाचे कनेक्शन काय ?

◾️ जांभळ्या रंगाकडे Gender Equality म्हणजे स्त्री-पुरुष समानतेचे प्रतिक म्हणून पाहिले जाते.

🔰भारतातील महिला दिन

◾️भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला.

🔰यंदाच्या महिला दिनाची थीम काय?

◾️१९९६ पासून महिला दिन एका थीमसह सातत्याने साजरा केला जात आहे. त्याप्रमाणे यंदाच्या महिला दिनाची थीम 📌'I am Generation Equality: Realizing Women's Rights' म्हणजेच मला जनरेशन समानता आणि महिलांच्या अधिकारांची जाणीव आहे. या थीमसह यंदाचा महिला दिन जगभरात साजरा करण्यात येणार आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 23 एप्रिल 2024

◆ युनायटेड स्टेट्स 2023 मध्ये सर्वाधिक लष्करी खर्च करणारा देश बनला आहे. ◆ केरळमध्ये सर्वात मोठा मंदिर उत्सव ‘थ्रिसूर पूरम 2024’ साजरा करण्...