Sunday 8 March 2020

कुपोषणमुक्त भारत तयार करण्याच्या उद्देशाने “सुपोषित माँ अभियान”

🔰 भारतात कुपोषण निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारत सरकारच्या महिला व कुटुंब कल्याण मंत्रालयाने “सुपोषित माँ अभियान” राबविण्यास सुरुवात केली. लोकसभा सभापती ओम बिर्ला ह्यांच्या हस्ते या राष्ट्रीय कार्यक्रमाचे उद्घाटन राजस्थानच्या कोटा या शहरात करण्यात आले.

🔰 या मोहिमेद्वारे किशोरवयीन मुली आणि देशातल्या गर्भवती महिलांना पोषक आहार प्राप्त व्हावा हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. भावी पिढ्यांना शारीरिक व मानसिकदृष्ट्या बळकट ठेवण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे.

🔴 योजनेचे स्वरूप

🔰 कार्यक्रमाच्या प्रारंभीक टप्प्यात 1 महिना आणि 12 दिवस या कालावधीत 1000 गर्भवती महिलांना संतुलित आहार दि जाणार आणि आवश्यक चाचण्या, अल्ट्रासाऊंड, रक्त तपासणी यासारख्या सर्व वैद्यकीय खर्चाचा भार सरकार उचलणार आहे.

🔰 गहू, हरभरा, मका, बाजरीचे पीठ, गूळ, डाळी, मसूर, तूप, शेंगदाणे, तांदूळ आणि खजूर इ. पौष्टिक वस्तू प्रत्येक कुटुंबातल्या एका गर्भवती महिलेस देण्यात येणार.

🔰 उद्घाटनाला 1000 गर्भवती महिलांना संतुलित आहार असलेल्या 17 किलोग्राम इतक्या वजनाच्या अन्न पदार्थांचे 1000 संच वितरित करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...