Wednesday 26 August 2020

महणी व अर्थ



🌷एका म्यानात दोन तलवारी राहात नाहीत------
दोन तेजस्वी माणसे एकत्र गुण्यागोविंदाने राहू शकत नाहीत


🌷एका हाताने टाळी वाजत नाही------
भांडणाचा दोष एकाच पक्षाकडे असत नाही


🌷एकाच माळेचे मणी------
येथून तेथून सगळे सारखेच


🌷एकाची जळते दाढी, दुसरा त्यावर पेटवी विडी------
दुसऱ्याच्या अडचणीचा किंवा दुःखाचा विचार न करता, स्वतःचा फायदा पाहण्याची दृष्टी ठेवणे


🌷एकादशीच्या घरी शिवरात्र------
एका दरिद्री माणसाला दुसऱ्या दरिद्री माणसाचा काहीच उपयोग नाही


🌷एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरु मारु नये------
एकाने वाईट गोष्ट केली म्हणून दुसऱ्याने लहानशी देखील वाईट गोष्ट करु नये


🌷ऐकावे जनाचे करावे मनाचे------
सर्वांचा विचार घ्यावा व आपणास योग्य वाटेल ते करावे


🌷ऐकून घेत नाही त्याला सांगू नये काही------
जो सांगितलेले ऐकत नाही, त्याला उपदेश करण्यात काय अर्थ?


🌷ऐतखाऊ लांडग्याचा भाऊ------
कष्ट केल्याविना खाण्याची सवय असणारा, जेथे आयते खायला मिळेल तेथे चांगलाच ताव मारुन घेतो

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...