सामान्य माहिती

‘द एस्ट्रोफिजिकल’ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासामध्ये कशाचा नवीन वर्ग स्पष्ट करण्यात आला आहे, ज्याला ‘हायसिन किंवा हायशन ग्रह’ असे नाव देण्यात आले आहे?
उत्तर : सूर्यमालेबाहेरील ग्रह

कोणत्या व्यक्तीला ‘बेहलर कासव संवर्धन पुरस्कार’ प्रदान करण्यात आला?
उत्तर : शैलेंद्र सिंग

कोणत्या राज्यात ‘भीतरकनिका राष्ट्रीय अभयारण्य’ आहे?
उत्तर : ओडिशा

कोणत्या राज्यात डायनासोर प्रजातीच्या तीन उपजातींच्या पायाचे ठसे शोधले गेले आहेत, ज्यामुळे ‘मेसोझोइक’ युगादरम्यान ‘टेथिस’ महासागरासाठी समुद्रकिनाऱ्याची निर्मिती झाली होती?
उत्तर : राजस्थान

कोणत्या खेळाडूने ‘२०२० टोकियो पॅरालिम्पिक’मध्ये बॅडमिंटन पुरुष एकेरी SL3 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले?
उत्तर : प्रमोद भगत

कोणत्या अंतराळ संस्थेने “इन्सपायरसॅट-1 क्यूबसॅट” उपग्रह तयार केला?
उत्तर : ISRO

कोणत्या देशाने २०१५ साली झालेल्या भूकंपामुळे क्षतिग्रस्त झालेल्या 117 वारसा वास्तु आणि आरोग्यविषयक प्रकल्पांचे पुनर्बांधकाम करण्यासाठी नेपाळसोबत सामंजस्य करार केला?
उत्तर : भारत

कोणत्या संस्थेने ‘ग्लोबल स्टेटस रिपोर्ट ऑन द पब्लिक हेल्थ रिस्पॉन्स टू डिमेंशिया’ या शीर्षकाखाली एक अहवाल प्रकाशित केला?
उत्तर :  WHO

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नसंच

1.कोणत्या आशियाई देशाने लिथियम आणि ग्रेफाइटसह 20 गंभीर खनिज ब्लॉक्सचा ई-लिलाव सुरू केला आहे? [अ] श्रीलंका [ब] इंडोनेशिया [क] भारत [डी] बांगल...