Monday 3 August 2020

परकीय भांडवल

1. खाजगी परकीय भांडवल –

i. परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक (FDI)

ii. परकीय अप्रत्यक्ष गुंतवणूक (FIIs ADRs GDRs)

2. सार्वजनिक परकीय भांडवल किंवा विदेशी मदत

🅾बायलॅटरल हार्ड लोन्स

🅾बायलॅटरल सॉफ्ट लोन्स

🅾मल्टीलॅटरल सॉफ्ट लोन्स

🅾असा दर्जा परकीय वित्तीय संस्थांना भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत दिला जातो.  

🅾त्यानुसार या संस्थांना भारतीय कंपन्यांच्या रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संमती प्त होते. त्यांना कपन्यांमध्ये मात्र मालकी हक्क प्राप्त होत नाही.    

🅾ADRs (Americal Depository Receipts) व GDRs (Global Depository Receipts) यांच्या सहाय्याने भारतीय कंपन्यांना परदेशी भांडवल बाजारातून भांडवल उभारणी करता येते.

परकीय भांडवल (Foreign Capital).

🅾देशात येणारे परकीय भांडवल विविध स्वरुपात येते. त्याचे प्रकार पुढीलप्रमाणे-

🅾खाजगी परकीय भांडवल (Private Foreign Capital) –

🅾हे भांडवल प्रत्यक्ष गुंतवणूक किंवा अप्रत्यक्ष गुंतवणुकीच्या स्वरुपात येत असते.

🧩परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक (Foreign Direct Investment: FDI) –

🧩अर्थ:

🅾ही गुंतवणूक भारतात प्रकल्प व मशीनरी (plant and machinery) निर्माण करण्यासाठी वापरण्यात येते.

🅾अशा मालमत्तेवर परकीय गुंतवणुकदाराचे जवळजवळ पूर्ण कायदेशीर (legal and formal) नियंत्रण/मालकी असते.

1) परकीय कंपनीची शाखा किंवा संलग्न संस्था (subsidiary) स्थापन करून,

2) परकीय कंपनीचे भारतीय कंपनीबरोबर कोलॅबोरेशन इ.

परकीय अप्रत्यक्ष गुंतवणूक (Foreign Indirect Investment).

🅾या गुंतवणुकीला पोर्टफोलिओ गुंतवणूक (portfolio investment) तसेच रेंटीअर गुंतवणूक (rentier investment) असेही म्हणतात.

🧩अर्थ:

🅾परकीय गुंतवणूकदारांची भारतीय कंपन्यांच्या रोख्यांमध्ये (शेअर्स, दिबेंचर्स इ.) गुंतणूक केल्यास तिला परकीय अप्रत्यक्ष गुंतवणूक असे म्हणतात. अशा रोख्यांना भारत सरकारने हमी दिलेली असते.

🅾शेअर्स विकत घेणार्‍या गुंतवणूकदारांचे मात्र भारतीय उधोगांवर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण/मालकी निर्माण होत नाही. त्यांना फक्त लाभांश मिळविण्याचा अधिकार असतो.

🅾अप्रत्यक्ष गुंतवणुकीत पुढील बाबींचा समावेश होतो- FIIs, ADRs, GDRs इत्यादी. FIIs (Foreign Institutional Investers) हे परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार असतात.

भारताचा परकीय चलन साठा (foreign Exchange Reserves in India).

🅾परकीय चलन साठा हा देशाच्या व्यवहार तोलाचा महत्वाचा घटक असतो आणि त्यावरून देशी अर्थव्यवस्थेच्या बाह्य स्थितीचा अंदाज येत असतो.

🅾देशाच्या परकीय चलन साठयामध्ये पुढील महत्वाच्या बाबीचा समावेश होतो.

1) RBI कडील परकीय चलन मालमत्ता

2) RBI कडील सोन्याचा साठा

3) SDRs (Special Drawing Rights)

4) IMF कडील आरक्षित निधी (Reserve Tranche Position (RTP) in the IMF)

🅾भारताच्या परकीय चलन साठयाचा स्तर मुख्यत: रिझर्व्ह बँकेने परकीय चलन बाजारात केलेल्या हस्तक्षेपाचा परिणाम असतो. हा हस्तक्षेप मुख्यत: रूपयाच्या विनिमय दराच्या चढउतारावर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जात असतो. अशा हस्तक्षेपासाठी अमेरिकन डॉलर व युरो या दोन चलनांचा वापर केला जातो. रिझर्व्ह बँकेच्या ताब्यातील परकीय चलन मालमत्ता अमेरिकन डॉलर, युरो, पाउंड स्टर्लिंग, ऑस्ट्रेलियन डॉलर, जपानी येन यांसारख्या प्रमुख चलनांमध्ये ठेवली जाते. मात्र परकीय चलन साठा केवळ अमेरिकन डॉलरच्या संदर्भातच मोजला जातो व व्यक्त केला जातो.

🅾भारताचा परकीय चलन साठा मार्च 1991 अखेर केवळ 5.8 अब्ज डॉलर इतका घसरला होता. त्यानंतर मात्र उदारीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारताकडे परकीय चलनाचा ओघ वाढू लागला. भारताचा परकीय चलन साठा 19 डिसेंबर 2003 रोजी 100 अब्ज डॉलर बनला. 6 एप्रिल 2007 रोजी संपलेल्या आठवडयात परकीय चलन साठयाने 200 अब्ज डॉलरचा टप्पा पार केला.

🅾29 फेब्रुवारी, 2008 रोजी संपलेल्या आठवडयात भारताच्या परकीय चलनाच्या साठयाने 300 अब्ज डॉलर्सचा टप्पा पार केला. मे 2008 च्या शेवटी भारताचा परकीय चलन साठा आतापर्यंतचा सर्वाधिक म्हणजे 314.6 अब्ज डॉलर इतक्या उच्चांकी स्तरावर पोहोचला होता.

🅾त्यानंतर मात्र जागतिक वित्तीय मंदीमुळे भारताकडे येणार्यात गुंतवणुकीच्या ओघ कमी झाल्याने भारताचा परकीय चलन साठा कमी होवून डिसेंबर 2009 अखेरीस 283.5 अब्ज डॉलरपर्यंत घसरला. मात्र त्यात पुन्हा वाढ होत जाऊन 2011 अखेर परकीय चलन साठा पुन्हा 303.482 अब्ज डॉलर्स इतका बनला. 2012 मध्ये मात्र मंदीमुळे त्यात पुन्हा घट घडून आली आहे.

🅾ऑक्टोबर, 2012 मध्ये भारत हा जगातील 9 व्या क्रमांकाचा सर्वाधिक परकीय चलन साठा असलेला देश (युरोझोन व हाँगकाँग वगळता) ठरला. परकीय चलनाचा सर्वाधिक साठा असलेले देश पुढीलप्रमाणे : 1) चीन- 3,285 अब्ज डॉलर्स 2) जपान- 1 ,274 अब्ज डॉलर्स 3) सौदी अरेबिया- 614 अब्ज डॉलर्स 4) स्वित्झरलँड- 530 अब्ज डॉलर्स  

 

 आंतरराष्ट्रीय नाणे निधी (IMF) कडून सोने खरेदी.

🅾सप्टेंबर 2009 मध्ये IMF ने आपले वित्तीय संसाधने वाढविण्यासाठी (कमी उत्पन्न गटातील देशांना अधिक मदत करता यावी यासाठी) 403.3 टन सोने विकण्याचा निर्णय घोषित केला.

🅾त्यानुसार रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर 2009 मध्ये 6.7 अब्ज डॉलर्स खर्च करून 200 टन सोने खरेदी केले. त्यामुळे भारताच्या परकीय चलन साठयातील सोन्याचे प्रमाण 357.7 टनाहून 557.7 टनापर्यंत (एकूण साठयापैकी 6 टक्के) वाढले.

🅾तसेच त्याबरोबर भारत जगातील 10 व्या क्रमांकाचा सरकारी सोने धारण करणारा देश (official gold-holding country) बनला.

No comments:

Post a Comment

Latest post

हिमालयातील 8000 मी.उंचीपेक्षा जास्त उंची असणारी शिखरे..

-----------------======---------------------- शिखर               उंची(मी)             स्थान ---------------------------------------------...