Thursday 12 September 2019

‘1995 बेसल प्रतिबंध दुरुस्ती’  ठराव कायद्यात रूपांतरित.

💢 6 सप्टेंबर 2019 रोजी ‘1995 बेसल प्रतिबंध दुरुस्ती’ ठरावाला क्रोएशियाने (मंजुरी देणारा 97वा देश) मान्यता दिल्यानंतर आता हा आंतरराष्ट्रीय कायदा झाला आहे.

💢 ‘1995 बेसल प्रतिबंध दुरुस्ती’ कायदा हा जागतिक पातळीवर कचरा फेकण्याला प्रतिबंध करणारा कायदा आहे.

💢 नवा कायदा 5 डिसेंबर 2019 रोजी जगभरात लागू केला जाणार आहे.

            ⭕️ बेसल प्रतिबंध करारनामा 
   आणि दुरूस्ती ⭕️

💢 1995 साली सर्व सदस्य देशांनी बेसल प्रतिबंध करारनामा स्वीकारला.

💢 करार घातक टाकावू पदार्थांच्या प्रतिकूल परिणामापासून मानवी आरोग्याचे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे या उद्देशाने तयार करण्यात आला आहे

💢 सुधारित कायद्यानुसार, आर्थिक सहकार्य व विकास संघटना (OECD) समुहाचे सदस्य असलेल्या 29 श्रीमंत देशांकडून OECD-सदस्य नसलेल्या देशांकडे इलेक्ट्रॉनिक कचरा तसेच जीर्ण झालेले जहाज याच्यासोबतच घातक टाकावू पदार्थांची सर्वप्रकाराची निर्यात करण्यास प्रतिबंधित करण्यात आले आहे.

💢 या करारात किरणोत्सर्गी टाकावू पदार्थांच्या दळणवळणाची बाबी समाविष्ट करण्यात आलेली नाही.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 22 एप्रिल 2024

◆ केकी मिस्ती यांची HDFC लाइफ इन्शुरन्स बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ 6 वर्षांच्या तक्षवी वाघानीने 25 मीटरपेक्षा कमी अ...