Wednesday 11 September 2019

शेतकऱ्यांच्या मदतीला धावणार 'मेघदूत


◾️ यापुढे शेतकऱ्यांना घर बसल्या हवामान आणि कृषी सल्ल्याची माहिती मिळणार आहे. हवामान विभाग आणि भारतीय उष्णप्रदेशीय हवामान विज्ञान संस्थेने 'मेघदूत' हे ऍप विकसित केले आहे. या मोबाईल ऍपच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी ही सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.

◾️मेघदूत ऍपमुळे शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज घेत आपल्या पिकांचे नियोजन करता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसानही टाळण्यास हातभार लागणार आहे. देशभरातील शेतकऱ्यांना आपआपल्या जिल्ह्यानुसार आपल्या मातृभाषेत ही माहिती उपलब्ध होणार आहे.

◾️मागील दीड महिन्यांपासून या ऍपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती दिली जात असल्याची माहिती कृषी हवामान विभागाच्या सूत्रांनी ही माहिती दिली. यापूर्वी एसएमएसद्वारे आणि संकेस्थळावर माहिती दिली जात होती. मात्र या ऍपमुळे आता शेतकऱ्यांना अधिक माहिती उपलब्ध होईल.

◾️'मेघदूत' ऍपच्या माध्यमातून देशभरातील 658 जिल्ह्यांत माहिती दिली जाईल. आतापर्यंत 150 जिल्ह्यांना माहिती मिळत आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये माहिती देण्याचे कामही प्रगतीपथावर आहे. लवकरच तेथेही ही व्यवस्था उपलब्ध होईल.

◾️'मेघदूत' ऍपमध्ये तापमान, पाऊस आणि पीक सल्ल्याची माहिती दिली जाते. या ऍपच्या माध्यमातून मागील 10 दिवसांची आणि पुढील 5 दिवसांचा हवामान अंदाज आणि कृषी सल्ला उपलब्ध होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक नियोजन करण्यास मोलाची मदत होत आहे. पुढील एक-दोन दिवसात पाऊस पडणार असेल, तर शेतकरी पिकाला पाणी देणे आणि औषध फवारणी करणे टाळू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाचणार असून पिकाला फायदा होणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...