Wednesday 11 September 2019

असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन बॉडीज (AWEB) अध्यक्षपदी सुनील अरोरा

भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा ह्यांनी 3 सप्टेंबर 2019 रोजी असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन बॉडीज (AWEB) या आंतरराष्ट्रीय संघाचे अध्यक्षपद स्वीकारले. सन 2019 ते सन 2021 या कालावधीसाठी AWEBचे अध्यक्षपद रोमानियाकडून भारताकडे सोपविण्यात आले आहे. 2017 साली झालेल्या आमसभेत हा निर्णय घेण्यात आला होता. रोमानियाचे प्रतिनिधी आयन मिनकू रेड्यूलेस्कू ह्यांनी AWEBचा ध्वज सुनील अरोरा ह्यांना सोपवला आणि आता हा ध्वज सन 2021 पर्यंत भारताकडे राहणार. भारतीय निवडणूक आयोगाने 3 सप्टेंबर 2019 रोजी बेंगळुरू या शहरात AWEBची चौथी आमसभा आयोजित केली होती. त्यादरम्यान हा कार्यक्रम पार पडला. आमसभेने AWEBचे नवे उपाध्यक्ष म्हणून दक्षिण आफ्रिका या देशाचे ग्लेन व्ह्यूमा माशिनीनी तसेच नवे सरचिटणीस (महासचिव) म्हणून कोरिया प्रजासत्ताकचे जोंग्युन चोए यांच्या नियुक्तीलाही मान्यता दिली आहे. अरोरा यांनी अशी घोषणा केली की दस्तऐवज निर्मिती, संशोधन आणि प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी नवी दिल्लीतल्या ‘इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेन्ट (IIIDEM) या संस्थेमध्ये एक AWEB केंद्र सुरू केले जाणार आहे, जे निवडणुकीच्या उत्तमोत्तम पद्धती तयार करणार आणि क्षमता बांधणी वाढवण्याबद्दल कार्य करणार.

A-WEB बद्दल :-

असोसिएशन ऑफ वर्ल्ड इलेक्शन इलेक्शन बॉडीज (A-WEB) ही जगभरातल्या निवडणूक व्यवस्थापन मंडळांची (EMBs) सर्वात मोठी संघटना आहे. त्याची स्थापना दक्षिण कोरियाच्या सोंग-डू या शहरात 14 ऑक्टोबर 2013 रोजी झाली. आता त्याचे कायमस्वरूपी सचिवालय सोल (दक्षिण कोरिया) या शहरात आहे.

जगभरात मुक्त, निष्पक्ष, पारदर्शक आणि सहभागी तत्त्वावर निवडणुका घेण्यात कार्यक्षमता आणि प्रभावीपणा वाढवणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. यंदा युक्रेन, कंबोडिया, अफगाणिस्तान तसेच सिएरा लिओन, इंडोनेशिया आणि मॉरिशस हे नव्याने दाखल झालेले AWEBचे सभासद आहेत तर सहयोगी सदस्य म्हणून असोसिएशन ऑफ एशियन इलेक्शन अथॉरिटीज (AAEA) संघात सामील झाले आहे. आता संघात त्याचे सदस्य म्हणून 111 देशांमधली 120 निवडणूक आयोग मंडळे आणि सहयोगी सदस्य म्हणून 21 आंतरराष्ट्रीय संघटना सामील आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

इतिहासाच्या दृष्टीने महत्वाचे

◾️राष्ट्रीय काँग्रेसची महत्वाची अधिवेशने व त्याचे वैशिष्टे :-◾️ ▶️ 1885 – मुंबई – ओमेशचंद्र बॅनर्जी – राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन ▶️ ...