Wednesday 11 September 2019

ईस्टर संडे’च्या धक्क्यातून सावरत श्रीलंकेची नवी झेप


✍‘ईस्टर संडे’ला म्हणजेच २१ एप्रिल रोजी तीनशेहून अधिक निष्पाप नागरिकांचे बळी घेणाऱ्या साखळी बॉम्बस्फोटाच्या धक्क्यातून सावरलेली श्रीलंका अवघ्या चार महिन्यांत पूर्वपदावर आली आहे. एवढेच नव्हे, तर ‘युद्धाचा देश’ अशा प्रतिमेच्या पलीकडे जात जगभरातील पर्यटक आणि उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी कोलंबोत थेट समुद्रात तब्बल २६९ हेक्टरवर दुबईच्या धर्तीवर नवीन ‘पोर्ट सिटी’ उभारण्याची झेप या देशाने घेतली आहे.

✍या नव्या शहरात मुंबईप्रमाणेच वित्तीय केंद्र उभारण्यात येणार असून पाच वर्षांत या देशाचा चेहरा आणि आर्थिक स्थितीही बदललेली असेल, असा दावा केला जात आहे.

✍दोन ते तीन दशके लिबरेशन टायगर्स ऑफ तमीळ ईलम( एलटीटीई) सोबत चाललेला रक्तरंजित संघर्ष मार्च २००९मध्ये संपुष्टात आल्यानंतर गेल्या काही वर्षांत जनजीवन पूर्वपदावर आले होते. मात्र २१ एप्रिल रोजी ईस्टर संडेला झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेने श्रीलंका पुन्हा हादरून गेला. मात्र या हल्ल्यातून सावरून या देशाने केवळ चार महिन्यांत बॉम्बस्फोट घडविणाऱ्यांना धडा शिकवीत देशातील परिस्थितीही पूर्वपदावर आणली आहे. एवढेच नव्हे तर आर्थिक पातळीवर देशाला भक्कम करण्यासाठी तेथील सरकारने एक नवा प्रयोग हाती घेतला आहे.

✍देशाच्या आर्थिक राजधानीला-कोलंबो शहराला लागूनच असलेल्या समुद्रात तब्बल २६९ हेक्टर जागेवर भराव टाकून सिंगापूर, हाँगकाँग, दुबईप्रमाणेच दक्षिण आशियातील सर्वात मोठी अशी पोर्ट सिटी निर्माण केली जात आहे. चीनची चायना हार्बर इंजिनीअरिंग कंपनी या पोर्ट सिटीची उभारणी करीत असून त्यापैकी १६९ हेक्टर जमीन या कंपनीला दिली जाणार आहे.

✍विशेष म्हणजे या शहराच्या उभारणीसाठी श्रीलंका सरकारने स्वतंत्र कायदा करीत पोर्ट सिटीच्या उभारणीत पर्यावरण किंवा अन्य कोणत्याही कायद्याचा अडथळा येणार नाही याची खबरदारी घेतली असून पुढील २० वर्षांत हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

18 एप्रिल 2024 चालू घडामोडी

प्रश्न – WEF च्या 2024 च्या वर्गात अलीकडेच कोणाला यंग ग्लोबल लीडर म्हणून नाव देण्यात आले? उत्तर - अद्वैत नायर प्रश्न – जागतिक आवाज दिवस न...