Sunday 10 November 2019

भारताची प्राकृतिक माहिती

♦️भारताचा विस्तार 8 अंश 4 मिनिटे उत्तर ते 37 अंश 6 मिनिटे उत्तर अक्षांश,  38 अंश 7 मिनिटे पूर्व व 97 अंश 25 मिनिटे पूर्व रेखांश या दरम्यान आहे.

♦️भारताचे क्षेत्रफळ 32,87,263 चौ किमी आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात 7 वा क्रमांक लागतो. 

♦️भारतीय भुसीमा पुढील सात देशांना भिडते. पाकिस्तान, नेपाळ, भूतान, चीन, म्यानमार, बांगला देश.

♦️भारताच्या तिन्ही बाजुंनी हिंदी महासागर वेढलेला आहे. 

♦️भारत हा पूर्व गोलार्धातस्थित आहे.

♦️भारताची पूर्व पश्चिम लांबी 2913 आहे व उत्तर दक्षिण लांबी 3214 आहे.

♦️भारताची भुसीमा 15200 किमी एवढी आहे.

♦️जगाच्या एकूण भूभागांपैकी 2.4% क्षेत्रफळ भारताने व्यापले आहे.

♦️21 जून या दिवशी सूर्याची लांबरुप किरणे भोपाळ या शहरावर पडतात.

♦️जगातील सर्वोच्च शिखरापैकी सर्वात उंच सात शिखरे भारतातील हिमालय पर्वतरांगेत आढळतात.

♦️के 2 गोडविन ऑस्टिन हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शिखर आहे.

♦️कांचानगंगा हे शिखर भारतातील सिक्कीम व नेपाळ च्या सीमेवार आहे.

♦️भारतातील सर्वात मोठे वाळवंट थर चे वाळवंट आहे जे की पंजाब, हरयाणा, गुजरात व राजस्थान या राज्यात पसरलेले आहे. याचे क्षेत्रफळ 2,59,000 चौ किमी आहे.

♦️देशात सर्वात लांब समुद्र किनारपट्टी गुजरात राज्याला लाभलेली आहे. तिचे अंतर 1600 किमी एवढे आहे.

♦️भारतातील सर्वात मोठे शीत वाळवंट जम्मू काश्मीर व हिमाचल प्रदेशात पसरलेलं आहे.

♦️भारतात एकूण 29 राज्य व सात केंद्रशासित प्रदेश आहेत.

♦️क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य राजस्थान हे आहे.

♦️लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य उत्तरप्रदेश हे आहे.

♦️चेन्नई येथील मरिना बीच हे भारतातील सर्वात मोठे बीच आहे.

♦️देशातील गोड्या पाण्यातील सर्वात लांब बेट आसाम राज्यात ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात माजूली हे आहे. 

♦️भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिली दहा राज्य खलील प्रमाणे सांगता येतील

♦️राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, जम्मू काश्मीर, गुजरात, कर्नाटक, ओरिसा, तामिळनाडू, बिहार.

♦️भारतातील सर्वात मोठा जिल्हा लडाख हा आहे.

♦️भारतात सर्वात जास्त पाऊस चेरापुंजी येथे पडतो.

♦️भारतात भिलाई लोखंड व पोलाद प्रकल्प उभारण्याकरिता रशिया या देशाची मदत घ्यावी लागली.

♦️भारतात ताग निर्मितीचे प्रमुख केंद्र कोलकत्ता हे आहे.

♦️देशातील पहिली सार्वजनिक बस सेवा 15 जुलै 1926 रोजी मुंबई येथे सुरू करण्यात आली होती.

♦️देशातील पहिली मोटार कार 1897 ला कॉम्प्टन अन ग्रीव्हिज या कंपनीच्या मालकाने आणली होती.

♦️देशातील पहिला द्रुत गती महामार्ग मुंबई आणि पुणे दरम्यान बांधला गेला.

♦️सर्वात जास्त राज्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग एन एच 2,6,7 हे आहेत हे प्रत्यकी सहा राज्यातून जातात.

No comments:

Post a Comment

Latest post

महाराष्ट्रातील प्रमुख शिखर जिल्हा व उंची

🚦जिल्हा    🧗‍♂शिखर         उंची🌲 ------------------------------------------------- अहमदनगर     कळसुबाई        1646 नाशिक            स...