Sunday 10 November 2019

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1)  ...................... ! धोनी आऊट झाला.
   1) अरेरे    2) बापरे     
   3) अहो    4) अबब
उत्तर :- 1

2) ‘मुले गडावर चढतात’ या वाक्याचे वर्तमानकाळी नकारार्थी रूप शोधा.

   1) मुले गडावर चढत नाहीत    2) मुले गडावर चढली नव्हती
   3) मुले गडावर चढणार नाहीत    4) मुले गडावर चढत नसतील

उत्तर :- 1

3) खाली दिलेल्या शब्दांच्या यादीतून एकाच अर्थाचे शब्द तीन वेगवेगळया लिंगात आढळतात. योग्य पर्याय लिहा.

   1) कन्या, दुहिता, पोरगी, बेटी    2) रुमाल, पगोटे, पगडी
   3) लोटा, लोटी, लाटणे      4) झरा, ओढा, नदी

उत्तर :- 2

4) पुढील शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा. – लेखणी

   1) लेखणे    2) लेख     
   3) लेखण्या    4) लेखी

उत्तर :- 3

5) नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना
      .................. असे म्हणतात.
   1) वचन    2) लिंग      3) अव्यय    4) विभक्ती

उत्तर :- 4

6) पाय घसरला आणि पडलो – केवल वाक्य करा.

   1) पाय घसरला म्हणून पडलो    2) पाय घसरून पडलो
   3) पाय घसरला व पडलो      4) यापैकी नाही

उत्तर :- 2

7) ‘विलासरावांचा थोरला मुलगा आज क्रिकेटचा सामना चांगला खेळला.’ या वाक्यातील उद्देश्य वाक्य ओळखा.

   1) विलासरावांचा थोरला    2) मुलगा   
  3) क्रिकेटचा सामना    4) चांगला खेळला

उत्तर :- 4

8) ‘शिक्षक मुलांना शिकवितात’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

   1) कर्मणी प्रयोग    2) कर्तरी प्रयोग    3) भावे प्रयोग    4) संकरित प्रयोग

उत्तर :- 2

9) खालील सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा. – महादेव .............

   1) कर्मधारय    2) व्दंव्द      3) व्दिगू      4) अव्ययीभाव

उत्तर :- 1

10) सेलची जाहिरात वाचून हौसने खरेदीला गेलेल्या रमाबाईंच्या गळयातली किंमती माळ गर्दीत चोरीला गेली. बहिणीने विचारले –
     ‘केवढयाला झाली ही खरेदी
....................’ – या वाक्यातील रिकाम्या जागी कोणते विरामचिन्ह येऊ शकते ?

   1) पूर्णविराम वा प्रश्नचिन्ह      2) प्रश्नचिन्ह वा उद्गारवाचक चिन्ह
   3) स्वल्पविराम वा पूर्णविराम    4) पूर्णविराम वा उद्गारवाचक चिन्ह

उत्तर :- 2

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...