Tuesday 16 April 2024

रक्ताभिसरण संस्था

           
"हृदयाद्वारे शरीराच्या विविध अवयवांकडे रक्त पोहोचवण्याच्या आणि तेथून परत हृदयाकडे आणण्याच्या क्रियेस रक्ताभिसरण संस्था म्हणतात".

रक्ताभिसरण संस्था हृदय(Heart), रक्त(Blood), रक्तवाहिन्या(Blood Vessels) या पासून बनलेली आहे.

शोध : विल्यम हार्वे 1628  मध्ये
( फादर ऑफ अँजिओलॉजी, विल्यम हार्वे यांना सर्क्युलेटर असे म्हणतात)

शरीरातील महत्त्वाचा घटक हृदय.

       *प्रकार *
1)खुली रक्ताभिसरण संस्था .
2)बंद रक्ताभिसरण संस्था.
1) खुली रक्ताभिसरण संस्था:
रक्तवाहिन्या नसतात.
" मॉलुस्का" आणि "आर्थोपोडा" या गटातील सजीव  यात येतात. शुद्ध व अशुद्ध रक्त एकमेकात मिसळते .
अपवाद ऑक्टोपस ऑक्टोपस व स्क्विड  हे प्राणी बंद रक्ताभिसरण संस्था याच्यामध्ये येतो.
2)बंद रक्ताभिसरण संस्था:
यात रक्तवाहिन्या असतात .
शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकमेकात मिसळत नाही.
या संस्थेत उभयचर ,पृष्ठवंशीय ,सरपटणारे प्राणी येतात.

             *मानवी रक्त*
मानवी शरीरात रक्तवाहिन्या ची लांबी 97000 किलोमीटर आहे.
रक्तवाहिन्या(Blood Vessels): 3 प्रकार
1)धमनी(Arteries):
हृदयाकडून  शरीरांच्या सर्व भागांना ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा .
अपवाद- हृदयाकडून फुप्फुसाकडून  ऑक्सिजन विरहीत रक्त वाहून नेणारी एक अपवादात्मक धमणी असते जिला फुप्फुसभिगा /फुप्फुस धमणी (Pulmonary Arteryअसे म्हणतात
शरीराच्या खोलवर भागात असतात .
धमन्यांमध्ये झडपा नसतात .
धमन्या कमी लवचिक असतात.
  रक्तदाब जास्त असतो धमणी मध्ये सुमारे  सरासरी रक्तदाब 100mmHg असतो.

2)शिरा(Veins):
  शरीराच्या सर्व कविवा कडून ऑक्सिजन विरहीत रक्त हृदयाकडे पोचवतात.
अपवाद- फुप्फुसाभिगा शिरा(Pulmonary Vein) पुरुषाकडून हृदयाकडे ऑक्सिजनयुक्त  रक्त वहन करते.
शिरा जास्त लवचिक/ स्थितिस्थापक असतात.
शिरांमध्ये झडपा असतात.
शिरांमधील रक्तदाब दमण यांच्या मानाने खूप कमी म्हणजे 2mmHg असतो.

3) केशवाहिन्या(Capillaries)
केशवाहिन्या एकत्र येऊन शिरा तयार होतात केशवाहिन्या च्या धमनीका आणि शिरा यांना जोडतात.
केशवाहिन्याचा शरीरातील पेशी प्रत्यक्ष संबंध असतो म्हणजे केशवाहिन्या आणि पेशी यांच्या दरम्यान सतत ऑक्सिजन, कार्बनडाय-ऑक्साइड ,पोषकद्रव्ये ,हार्मोनस ,टाकाऊ पदार्थ यांची देवाण-घेवाण चालू असते.

       *रक्तदाबनुसार *
शिरांमधील रक्तदाब कमी असतो .
केशवाहिनी मधील रक्तदाब हा शिरा पेक्षा जास्त असतो व धमनी पेक्षा कमी असतो.
धमणी मध्ये सर्वाधिक रक्तदाब असतो.

        *जाडीनुसार*
केशवाहिन्या ह्या कमी जाडीच्या व आतून पोकळी जास्त असते . शीरा ह्या केशवाहिनी पेक्षा जाड असतात व धमणी पेक्षा कमी जाड असतात .
धमनी सर्वात जास्त जाड असते व आतून पोकळी कमी असते.

         *रक्त(Blood)*
खारट चव.
दोन घटकांनी बनलेले आहे

 
1】रक्तद्रव(Plasma):
  रंग-फिकट पिवळा रंग किंवा रंगहीन
सर्व रक्तापैकी 55% रक्तद्रव यापैकी 90%पाणी+7%प्रथिने+3% असेंद्रिय घटक
【7%प्रथिने
1-ग्लोब्ल्यूलिन: प्रतिद्रव्य (ऍन्टीबॉडी) तयार करते, प्रतिकार शक्ती नियंत्रित करते.
2-अलब्यूमिन: शरीरातील पाण्याचे नियंत्रण ठेवते.
3-प्रोथॉम्बिंन: रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत.
4-फायब्रीनोजन: रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत.】


2】रक्तपेशी(Corpuscle):
तीन प्रकार


1]RBC(Red Blood Cell)/लाल/तांबड्या/लोहित पेशी:
केंद्रकविरहित( अपवाद- उंट)
संख्या: A) पुरुष 52 लाख/mm^3 of Blood
          B) स्त्री 47 लाख/mm^3 of Blood
           RBC:WBC=  7:1 प्रमाण
आकार: गोल द्विअंतर्वक
निर्मिती: अस्थीमज्जा(Bone marrow)
आयुष्य: 125 -127 दिवस.
नाश: यकृतात (liver)
कार्य: RBCs मध्ये हिमोग्लोबिन असते.
हिमोग्लोबिन हे ऑक्सिजन व कार्बन डायॉक्साईडचे अल्पप्रमाणात वहन करते.
हिमोग्लोबिन मुळे रक्ताला लाल रंग येतो.
त्वचेला deep cherry red रंग carboxy haemoglobin मुळे येतो.
संबंधित रोग: १) ॲनिमिया रोग हिमोग्लोबिन च्या कमतरतेमुळे.
                   २) थॅलॅसेमिया रोग.


2]WBC(White Blood Cell)/श्वेत/पांढऱ्या/सैनिकी पेशी:
केंद्रक असते.
संख्या: 9 ते 10 हजार/mm^3 of Blood
निर्मिती: अस्थीमज्जा(bone marrow)
आकार:आकारहीन /अमिबसदृश्य
आयुष्य: 15 दिवस.
नाश: यकृतामध्ये
कार्य: शरीराला रोगप्रतिकारशक्ती मिळवून देणे म्हणून त्यांना सैनिकी पेशी म्हणतात.
संसर्ग झाल्यावर यांची संख्या वाढते.
संबधित रोग: १)रक्ताचा कॅन्सर (Leucamia) WBC वाढल्यावर
                २)एड्स -HIV T4 Lymphocytes वर हल्ला करतो.


3) रक्तबिंबिका /रक्तपट्टीका (platelets):
द्विबहिर्वक्र आकार .
रंगहीन
या फक्त सस्तन प्राण्यांमध्ये आढळतात.
केंद्र नसते .
अतिशय लहान असतात.
संख्या:2.5 ते 4 लाख/mm^3 of Blood
निर्मिती:अस्थीमज्जा(bone marrow)
कार्य: रक्त गोठण्याची क्रिया सुरू होण्यासाठी.
(डेंगू मलेरिया टाइफाइड इत्यादी रोगांमध्ये रक्तपट्टीकांचे प्रमाण कमी होते.)

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...