रक्त दोन प्रमुख घटकांनी बनलेले असते


1)  रक्तद्रव ( Plasma )

2) रक्तकणिका / रक्तपेशी (Blood corpuscles / cells)


🔸 रक्तद्रव (Plasma)


अ.)  रक्तद्रव फिकट पिवळसर रंगाचा, नितळ, काहीसा आम्लारीधर्मी द्रव असतो. यात सुमारे 90 ते 92% पाणी,

6 ते 8% प्रथिने

1 ते 2% असेंद्रिय क्षार

व इतर घटक असतात.


आ.) अल्ब्युमिन - संबंध शरीरभर पाणी विभागण्याचे काम करते.


इ.)  ग्लोब्युलीन्स - संरक्षणाचे काम करतात.


ई) फायब्रिनोजेन व प्रोथ्रोम्बीन रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करतात.


उ)  असेंद्रिय आयने - कॅल्शिअम, सोडिअम, पोटॅशिअम हे चेता आणि स्नायू ठेवतात. कार्याचे नियंत्रण


🔸रक्तकणिका / रक्तपेशी (Blood corpuscles / cells)


1. लोहित रक्तपेशी (RBC) 

आकाराने लहान, वर्तुळाकार, केंद्रक नसलेल्या पेशी या पेशीतील हिमोग्लोबीन या घटकामुळे रक्त लाल रंगाचे दिसते. हिमोग्लोबीनमुळे ऑक्सिजन रक्तात विरघळतो. 


• रक्ताच्या प्रत्येक घनमिलीमीटरमध्ये 50-60 लक्ष RBC असतात. RBC ची निर्मिती अस्थिमज्जेत होते व त्या सुमारे 100 ते127 दिवस जगतात.


2. श्वेत रक्तकणिका (पांढऱ्या पेशी) (WBC) 


आकाराने मोठ्या, केंद्रकयुक्त, रंगहीन पेशी रक्ताच्या प्रत्येक घनमिलीमीटरमध्ये 5000-10,000 पांढऱ्या पेशी असतात


🔸 या पेशींचे 5 प्रकार आहेत - 

बेसोफील, इओसिनोफिल, न्यूट्रोफील,

मोनोसाईट्स लिम्फोसाईट्स


• पांढऱ्या पेशींची निर्मिती अस्थिमज्जेत होते.


🔸 कार्य- 

पांढऱ्या पेशी, आपल्या शरीरात सैनिकाचे काम करतात. शरीरात कुठेही रोगजंतूचा शिरकाव झाल्यास त्यावर या पेशी हल्ला करतात. सूक्ष्मजीवांमुळे होणाऱ्या रोगांपासून रक्षण करतात.


3. रक्तपट्टीका (Platelets)


• या अतिशय लहान आणि तबकडीच्या आकारासारख्या असतात. 

• रक्ताच्या एका घनमिलीमीटरमध्ये या सुमारे 2.5 लक्ष ते 4 लक्ष असतात. 


🔸 कार्य - या रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये भाग घेतात.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नसंच

1.कोणत्या आशियाई देशाने लिथियम आणि ग्रेफाइटसह 20 गंभीर खनिज ब्लॉक्सचा ई-लिलाव सुरू केला आहे? [अ] श्रीलंका [ब] इंडोनेशिया [क] भारत [डी] बांगल...