२३ सप्टेंबर २०२०

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे ‘SPICe+’ डिजिटल व्यासपीठ कार्यरत


🔰कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने ‘SPICe+’ (स्पाइस प्लस) नामक डिजिटल व्यासपीठ कार्यरत केले आहे.


🔰कद्र सरकारची तीन मंत्रालये (कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, कामगार मंत्रालय आणि अर्थमंत्रालयातला महसूल विभाग), तसेच एक राज्य सरकार (महाराष्ट्र) आणि विविध बँका यांच्यातर्फे दिल्या जाणाऱ्या 10 सेवा या व्यासपीठामार्फत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, त्यामुळे भारतात व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रक्रिया, लागणारा वेळ आणि खर्च यात घट झाली आहे.


🔴या 10 सेवा खालीलप्रमाणे आहेत –


🔰नाव आरक्षण

🔰निगमन

🔰DIN वाटप

🔰PANचे अनिवार्य वाटप

🔰TANचे अनिवार्य वाटप

🔰EPFO नोंदणीचे अनिवार्य वाटप

🔰ESIC नोंदणीचे अनिवार्य वाटप

🔰वयवसाय कर नोंदणीचे अनिवार्य वाटप (महाराष्ट्र)

🔰कपनीसाठी बँक खाता अनिवार्यपणे उघडणे

🔰GSTIN याचे वाटप (जर अर्ज केला असेल तर)


🔴इतर ठळक बाबी...


🔰नवीन संकेतस्थळ आधारित अर्ज प्रक्रियेमुळे कंपन्यांच्या अखंडित अंतर्भूततेसाठी ऑन-स्क्रीन फाइलिंग आणि रीअल टाइम डेटा प्रमाणीकरण सुलभ होते.


🔰परक्रियेची संख्या आधीच्या 10 च्या तुलनेत 3 करण्यात आली आहे आणि देशात व्यवसाय सुरु करण्याचा कालावधी 18 दिवसांऐवजी 4 दिवस करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

प्रमुख नद्या आणि त्यांच्या उपनद्या

══════════════════════ ❀【गंगा】 1. गोमती 2. घाघरा 3. गंगा 4. कोसी 5. यमुना 6. पुत्र 7. रामगंगा ❀【यमुना】 1. चंबळ 2. सिंध 3. बेटवा 4. केन 5. टन...