हक्कभंग म्हणजे नेमकं काय ?


💫 अभिनेत्री कंगना पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हक्कभंगाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.


⚡️ यावेळी नेमकं हक्कभंग म्हणजे काय? हक्कभंग दाखल झाल्यास पुढे काय होतं?


💁‍♂️ हक्कभंग कधी होतो?:


▪️ खासदार आणि आमदार अशा लोक प्रतिनिधींना घटनेने काही विशेषाधिकार प्रदान केलेले आहेत. विधानसभेने नेमलेल्या समितीलाही असे विशेष अधिकार असतात. 


▪️ या अधिकारांच्या आड येणारे वक्तव्य किंवा वर्तन कोणत्याही व्यक्ती किंवा समुदायाला करता येत नाही.


▪️ आमदार विधानसभेत जे विचार मांडतात. त्यावर इतरांना विधानसभेच्या बाहेर टीका-टिप्पणी करता येत नाही, अन्यथा तो हक्कभंग ठरु शकतो.


💁‍♂️ हक्कभंग असा निदर्शनास आणतात :


▪️ सभागृह समितीचा अहवाल

▪️ विधिमंडळ सभासदाकडून तक्रार

▪️ विधानसभा सचिवांचा अहवाल

▪️ याचिका


💁‍♂️ शिक्षा :

1)आरोपी स्वतः आमदार असेल तर सभागृहातून त्याची हकालपट्टी केली जाऊ शकते.


2)  दुसरा कोणी तिर्‍हाईत असेल तर समज देऊन सोडून देण्यापासून तुरुंगवास ठोठावण्यापर्यंत कोणतीही शिक्षा होऊ शकते.


📌 दरम्यान, कंगना रनौत आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आला.

No comments:

Post a Comment

Latest post

ZP पद भरती Strategy

📌📌 Strategy📌📌                मागचे तीन दिवस आयबीपीएस(IBPS) ने पशुसंवर्धन विभागासाठी परीक्षा घेतल्या. या परीक्षांमधील मराठी आणि इंग्लिश...