Wednesday 23 September 2020

मनमोहन सिंग यांना भारतरत्न द्या; वरिष्ठ पत्रकाराची मागणी.


 

✳️माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी वरिष्ठ महिला पत्रकार सागरिका घोष यांनी केली आहे.


✳️दशातील सुमारे २७ कोटी जनतेला दारिद्र्य रेषेतून बाहेर काढल्याने मनमोहन सिंग या पुरस्काराचे मानकरी असल्याचं घोष यांनी म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडियामध्ये लिहिलेल्या आपल्या ब्लॉगमधून त्यांनी अप्रत्यक्षपणे हा मुद्दा उपस्थित केला आहे.


✳️घोष यांनी म्हटलं की, भारताचे १३वे राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचं नुकतचं निधन झालं तेव्हा मनमोहन सिंग आपल्या माजी सहकार्याची प्रशंसा करताना थांबत नव्हते. त्यांनी मुखर्जी यांना स्वतंत्र भारतातील महान नेत्यांपैकी एक म्हटलं आहे. घोष पुढे म्हणाल्या, प्रणव मुखर्जींनी दीर्घकाळ सरकारमध्ये असणं ही एक असाधारण गोष्ट आहे. मात्र, एक प्रश्न असाही आहे की, मनमोहन सिंग हे आपल्या सहकाऱ्याच्या तुलनेत भारतरत्नसाठी अधिक योग्य आहेत?


✳️मनमोहन सिंग सन १९९१ मध्ये जेव्हा अर्थमंत्री बनले, तेव्हा त्यांनी अनेक बदल घडवून आणले. पी. व्ही. नरसिंह राव यांच्या पाठिंब्याने त्यांनी दशकांपासून सुरु असलेल्या मजबूत नियंत्रित अर्थव्यवस्थेला मुक्त केले. २००६ ते २०१६ दरम्यान २७१ मिलियन म्हणजेच २७.१ कोटी लोकांना दारिद्र्य रेषेखालून वर काढले. या काळात मोठ्या कालावधीसाठी मनमोहन सिंग हेच देशाचे पंतप्रधान राहिले. भारतातील करोडो लोकांना दारिद्र्य रेषेखालून वर काढल्याची आकडेवारी संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केली आहे. आत्ताच्या गरिबांसाठीच्या अनेक योजना जशा वित्तीय समावेशन, मनरेगा आणि आधार कार्ड त्यांच्याच कार्यकाळातील देणं आहे, असं घोष यांनी ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

संयुक्त गट "ब" आणि "क" पूर्व परीक्षा सराव चाचणी क्र.

 क्रिकेट बाँल ही खालीलपैकी कोणत्या फळाची जात आहे. ? ⚪️ दराक्ष  ⚪️ मोसंबी  ⚪️ डाळिंब ⚫️ चिकू ☑️ महाराष्ट्रात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने...