Friday 7 August 2020

विठ्ठल रामजी शिंदे.

🅾जन्म - 23 एप्रिल 1873, जामखिंडी, कर्नाटक.

🅾मृत्यू - 2 जानेवारी 1944.

🅾1932 - 33: बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड परितोषिक.
'महाराष्ट्राचे अपेक्षित मानकरी' गं. बा. सरदार.'निष्काम कर्मयोगी', भाई माधवराव बागल.

🅾जनतेकडून 'महर्षी' ही पदवी.
अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रश्र्न राष्ट्रीय एकात्मतेशी जोडला.

🧩संस्थात्मक योगदान :

🅾1905 - मुंबई येथे तरुण अस्तिकांचा संघ स्थापन.

🅾18 ऑक्टोबर 1906 - डिप्रेस्ड क्लास मिशनची मुंबई येथे स्थापना. पहिले अध्यक्ष - न्या. चंदावकर.

🅾1910 - जेजूरी येथे मुरळी प्रतिबंधक चळवळ.द्याराम गिड्डमल यांच्या सहकार्याने 'सेवा सदन' ही संस्था.

🅾अनाथाश्रम - रावजी भोसले यांच्या सहकार्याने पंढरपूर येथे देवदासी प्रथा व व्यसनमुक्ति कार्य.ब्राहय समाजाच्या प्रसारासाठी ब्राहय पोस्टल मिशनची स्थापना.

🅾23 मार्च 1918 - अस्पृश्यता निवारक संघ.

🅾1918 - मराठा समाजात जागृतिंनिर्माण करण्यासाठी मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना.

🅾1920 - पुण्यातील दुष्काळ पीडितांसाठी दुष्काळ आपत्ती निवारण संस्था.

🅾1937 - स्त्रियांसाठी अहिल्याश्रम.

🅾1923 - तरुण ब्रहयो संघ.

🅾1937 - बहुजन पक्षाची स्थापना.
स्त्रियांसाठी आर्यमहिला समाज, कौटुंबिक उपासना मंडळ.वृद्धंनसाठि संगत सभा.

🧩लेखन :

🅾प्रार्थना समाजाच्या सुबोध पत्रिकेत लेखन.1903 - प्रार्थना समाजाच्या सदस्यांसाठी उपासना हे साप्ताहिक.

🅾1903 - अ‍ॅमस्टारडॅम येथे जागतिक धर्म परिषदेत 'हिंदुस्थानातील उदारधर्म' हा निबंध वाचला.Thiestic Directory जागतिक उदार धर्माची माहिती सांगणारा धार्मिक ग्रंथ लिहाला.

🅾Untouchable India,
History Of Partha,
भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र .

🧩वैशिष्ट्ये :

🅾शिमग्याच्या सणातील बीभत्स प्रकारांना आळा बसावा म्हणून जनजागृती मोहीम.अस्पृश्यानसाठी रूपी फंड हा उप्रकार.

🅾1904 - मुंबई धर्म परिषद.

🅾1905 - अहमदनगर जवळ भिंगार येथे अस्पृश्योध्दाराची शपथ.

🅾1918 - मुंबई येथे अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद भरविली. अध्यक्ष सायाजीराव गायकवाड.

🅾1924 - वायकोम सत्याग्रह (त्रावनकोर), अस्पृश्य सत्याग्रहात सहभाग.

🅾1935 - बडोदा मराठी साहित्य संमेलनात तत्वज्ञान व समाजशास्त्र शाखेचे अध्यक्ष.

🅾स्त्रियांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जपान मधील विद्या पिठाच्या धर्तीवर भारतात महिला विद्यापीठे व्हावीत, असे मत.
शाहू महाराजांनी क्षात्र जगतगुरुपदी मराठा व्यक्ति नेमल्याबद्दल निषेध केला.

💠💠विठ्ठल रामजी शिंदे ऊर्फ महर्षी शिंदे.💠💠

🅾 ( जमखिंडी, २३ एप्रिल, इ.स. १८७३ - २ जानेवारी, इ.स. १९४४) हे मराठी समाजसुधारक, धर्मसुधारक व लेखक होते.

🧩जीवनसंपादन...

🅾शिंदे यांनी पुण्याच्या फर्गुसन कॉलेजमधून बी.ए.ची पदवी मिळवली. कायद्याच्या शिक्षणाचे प्रथम वर्ष उत्तीर्ण केल्यावर ते एल्एल.बी. परीक्षेकरिता मुंबईला गेले.तेथे ते प्रार्थना समाजातदाखल झाले. १८ ऒक्य़ोबर, इ.स. १९०६ रोजी महर्षी शिंदे यांनी ‘'डिप्रेस्ड क्लास मिशन’' या संस्थेची स्थापना केली. त्यांनी इ.स. १९२८ साली पुणे येथे शेतकरी परिषद भरवली.

🧩लेखनसंपादन..

🅾शिंदे यांनी वेगवेगळ्या कालखंडात रोजनिशी लिहिली. पहिल्यांदा १८९८ मध्ये फर्ग्युसन कॉलेजात शिकत असताना, मग १९०१-३ या काळात इंग्लंडमध्ये धर्मशिक्षण घेत असताना, व त्यानंतर कायदेभंग सहभागाबद्दल शिक्षा झाल्यानंतर १९३० साली येरवडा तुरुंगात असताना त्यांनी रोजनिशींचे लेखन केले आहे.

🅾याशिवाय १९२८ साली शिंदे यांनी 'ब्राह्मसमाज शतसांवत्सरी सफर' नावाची रोजनिशी लिहिली आहे. या चारही रोजनिशीत महर्षी शिंदे यांच्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 08 मे 2024

◆ ‘जागतिक रेडक्रॉस दिन’ दरवर्षी 8 मे रोजी साजरा केला जातो. ◆ व्लादिमीर पुतिन हे पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. ◆ ‘बॉर्डर रो...