28 June 2025

चालू घडामोडी :- 27 जून 2025

◆ व्यवसाय जबाबदारी आणि शाश्वतता अहवाल (BRSR) SEBI या संस्थेने सुरू केला.


◆ जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत अलीकडेच समाविष्ट झालेले सालखान जीवाश्म उद्यान उत्तर प्रदेश राज्यात आहे.


◆ केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी भारतातील पहिले सागरी एनबीएफसी, सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (SMFCL) सुरू केले.


◆ आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती (IOC) च्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष "केर्सी कोव्हेंट्री" बनल्या आहेत.


◆ दरवर्षी 25 जून रोजी आंतरराष्ट्रीय नाविक दिन साजरा केला जातो. 


◆ आंतरराष्ट्रीय नाविक दिन 2025 ची थीम "आमचा समुद्र, आमची जबाबदारी, आमची संधी" (Our Ocean, Our Responsibility, Our Opportunity) अशी आहे.


◆ आंतरराष्ट्रीय नाविक दिनाची 2024 ची थीम "भविष्यात नेव्हिगेट करणे: सुरक्षितता प्रथम!" आहे.


◆ भारतातील पहिली क्वांटम कॉम्प्युटिंग व्हॅली आंध्र प्रदेश राज्यात स्थापन होत आहे.


◆ भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य केरळ राज्यात स्थापन करण्यात आले आहे.


◆ पासपोर्ट सेवा पोर्टल परराष्ट्र मंत्रालयाने स्थापन केले आहे.


◆ 2025 च्या अमरनाथ यात्रापूर्वी भारतीय लष्कर आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांवर सुरू केलेल्या कारवाईचे नाव "ऑपरेशन बिहाली" आहे.


◆ कोलकाता येथील बोस इन्स्टिट्यूटमधील शास्त्रज्ञांनी उष्णता आणि जिवाणू संसर्गापासून वनस्पतींचे संरक्षण करण्यासाठी एक सुधारित CRISPR साधन विकसित केले आहे.


◆ बनकाचेरला जलाशय प्रकल्पावरून "तेलंगणा आणि आंध्र प्रदेश" या दोन राज्यांमध्ये आंतरराज्यीय पाणी वाद सुरू आहे.


◆ द्वारका एक्सप्रेसवे हा भारतातील पहिला मार्ग बनला आहे ज्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) आधारित ॲडव्हान्स्ड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (ATMS) बसवले आहे.


No comments:

Post a Comment