Thursday 21 November 2019

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) पर्यायी उत्तरांतून योग्य ते उत्तर सांगा? ‘ईश्वरनिर्मित’

   1) नत्रतत्पुरुष समास    2) तृतीया तत्पुरुष समास
   3) प्रादी समास      4) कर्मधारय समास

उत्तर :- 2

2) बोलणा-याच्या तोंडचे शब्द सूचित करण्यासाठी कोणत्या चिन्हाचा वापर करतात ?

   1) एकेरी अवतरण (´    ´)    2) दुहेरी अवतरण (“   ”)
   3) उद्गार चिन्ह ( ! )    4) स्वल्प विराम ( , )

उत्तर :- 2

3) ‘अणूरेणूहून थोकडा | तुका आकाशा एवढा’ यातील अलंकार ओळखा.

   1) चेतनगुणोक्ती    2) भ्रांतिमान    3) विरोधाभास    4) सार

उत्तर :- 3

4) अभ्यस्त शब्द ओळखा.

   1) बारीक सारीक  2) बारकुडा    3) बारकावा    4) बारावा

उत्तर :- 1

5) ‘गंगेत गवळयांची वसती’ या वाक्यात कोणती शब्दशक्ती आहे ?

   1) अभिधा    2) लक्षणा    3) व्यंजना    4) योगरूढ

उत्तर :- 2

6) ‘पथ’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.

   1) रस्ता    2) वळण      3) रूळ      4) पूल

उत्तर :- 1

7) ‘भंग’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द सांगा.

   1) भग्न    2) निर्भय      3) सभंग      4) अभंग

उत्तर :- 4

8) ‘पिकते तेथे विकत नाही’ या म्हणीचा अचूक पर्याय कोणता ?

   1) मिळेल त्यावर संतोष मानणे    2) निर्मितीच्या ठिकाणी मूल्य नसते
   3) कुठेही काही विकले जात नाही    4) कुठेही काहीही पिकते

उत्तर :- 2

9) खालीलपैकी ‘मारामारी करणे’ हा अर्थ कोणत्या वाक्प्रचाराचा आहे  ?

   1) दोनाचे चार हात होणे      2) हात पसरणे
   3) हाती हात घेणे      4) दोन हात करणे

उत्तर :- 4

10) खालील विधानातील अधोरेखित शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता ?

      पंधरा दिवसातून एकदा भरणारी अशी आमची बैठक असते.

   1) दैनिक    2) वार्षिक    3) पाक्षिक    4) मासिक

उत्तर :- 3

No comments:

Post a Comment

Latest post

भारतीय कर संरचना (Indian Tax Structure)

व्याख्या :- "जनतेच्या कल्याणासाठी शासनाला करावा लागणारा खर्च भागविण्याच्या हेतूने शासनाने लोकांकडून सक्तीने घेतलेली रक्कम म्हणजे कर होय...