Thursday 21 November 2019

गगनभरारीची प्रेरणा देणारी अंतराळपरी कल्पना चावला

अवकाशात प्रवेश करण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या 'कल्पना चावला' यांनी आजच्याच दिवशी अंतराळात झेप घेतली होती. यानिमित्‍ताने जाणून घेऊयात त्यांचा प्रवास...

● *जन्म* :  17 मार्च 1962 हरियाणा.
● *वडिल* : बनारसीलाल चावला.
● *आई* : संयोगीता चावला.

● *शिक्षण* : शालेय शिक्षण गावातील टागोर बाल निकेतन विद्यालयात झाले. पंजाब विद्यापीठातून एरोनॉटिकल अभियांत्रिकी पदवी घेतली. कॉलोरॅडो विद्यापीठातून 1988 मध्ये डॉक्टरेट मिळवली. 1994 साली अमेरिकेतील नासामध्ये निवड झाली.

💁‍♂ *आयुष्यातील काही खास गोष्‍टी* :

*1)* अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA इथे त्यांनी 1988 पासून फ्ल्युड डायनॅमिक्समध्ये संशोधनाला सुरुवात केली.

*2)* नासाने 1994 साली संभाव्य अतंराळवीराच्या यादीत कल्पना यांचा समावेश केला.

*3)* एका वर्षाच्या प्रशिक्षणानंतर अंतराळ यानाच्या नियंत्रण कक्षाच्या देखभालीचे त्यांनी काम केले.

*4)* नोव्हेंबर 1996 मध्ये ATS-87 मिशनच्या संशोधनाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली.

*5)* 19 नोव्हेंबर 1997 या दिवशी कल्पना चावला यांनी अंतराळात झेप घेतली.

*6)* त्यानंतर त्यांनी तब्बल 376 तास आणि 34 मिनिने अंतराळात घालवली.

*7)* त्यांनी पृथ्वीला 252 फेऱ्या मारत 1 कोटी 46 हजार किमीहून अधिक प्रवास केला.

*8)* जानेवारी 2003 च्या 16 दिवसांच्या मिशनमध्ये त्यांची विशेष तज्ज्ञ म्हणून नेमणूक झाली होती.

*9)* 1 फेब्रुवारी 2003 ला कोलंबिया अंतराळ यानाने पृथ्वीकडे झेप घेऊन सकाळच्या 8.40 वा. यानाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला.

*10)* 22 मिनिटामध्ये हे यान पृथ्वीवर उतरणार इतक्यात यानाचा आणि नियंत्रण कक्षाचा संपर्क तुटला. आणि कोलंबिया यान इतिहासात जमा झाले. त्यातच अंतराळवीरांचे निधन झाले.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 23 एप्रिल 2024

◆ युनायटेड स्टेट्स 2023 मध्ये सर्वाधिक लष्करी खर्च करणारा देश बनला आहे. ◆ केरळमध्ये सर्वात मोठा मंदिर उत्सव ‘थ्रिसूर पूरम 2024’ साजरा करण्...