Wednesday 20 November 2019

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) अचूक विधाने निवडा.

   अ) च, ना, पण, मात्र हे शब्द शब्दयोगी अव्यये आहेत.
   ब) च, ना, पण, मात्र हे कैवल्य वाचक शब्दयोगी अव्यये आहेत.

   1) फक्त अ अचूक    2) फक्त ब अचूक   
   3) दोन्ही अचूक      4) दोन्ही चूक

उत्तर :- 3

2) उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. – ‘विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली.’

   1) विकल्पबोधक    2) समुच्चयबोधक   
   3) न्युनत्वबोधक      4) परिणामबोधक

उत्तर :- 2

3) चुप, चिंग, गप, गुपचित, बापरे
      वरीलपैकी किती मौनदर्शक अव्यये आहेत.

   1) चार      2) पाच      3) तीन      4) एक

उत्तर :- 1

4) ‘मी निबंध लिहितो’ अपूर्ण भविष्यकाळ करा.

   1) मी निबंध लिहिला    2) मी निबंध लिहित जाईन
   3) मी निबंध लिहित असेन  4) वरील एकही पर्याय योग्य नाही

उत्तर :- 3

5) ‘विव्दान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.

   1) पंडिता    2) विदुषी      3) हुषार      4) यापैकी काहीही नाही

उत्तर :- 2

6) पुढील शब्दाचे अनेकवचनी रुप ओळखा. – आज्ञा

   1) आज्ञे    2) आज्ञा     
   3) आज्ञी    4) आज्ञाने

उत्तर :- 2

7) ‘देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ?

   1) प्रथमा    2) व्दितीया   
   3) तृतीया    4) सप्तमी

उत्तर :- 3

8) ‘कोणीही गडबड करू नका’ हे वाक्य होकारार्थी करा.

   1) शांत बसणारे गडबड करीत नाहीत    2) गडबड करणारे शांत बसतात

   3) काय ही गडबड !        4) सर्वांनी शांत बसा

उत्तर :- 4

9) ‘पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात’ या वाक्यातील अधोरेखित शब्द .................. चे काम करतात.

   1) उद्देश्यविस्तार  2) उद्देश्य     
   3) क्रियापद    4) विशेषण

उत्तर :- 1

10) खालील वाक्यातील ‘प्रयोग’ ओळखा. – आईने मधुराला बोलावले.

   1) कर्तरीप्रयोग    2) भावे प्रयोग   
   3) कर्मणीप्रयोग    4) संकीर्ण प्रयोग

उत्तर :- 2

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...