Wednesday 20 November 2019

पृथ्वीला प्राप्त झालेल्या गती व त्याच्या परिणामांबद्दल माहिती


पृथ्वी सूर्याभोवती तसेच स्वत:भोवती फिरते. यामुळे पृथ्वीला परिवलन आणि परीभ्रमण अशा दोन गती प्राप्त झालेल्या आहेत.

परिवलन गती

पृथ्वीच्या स्वत:भोवतीच्या फिरण्याला परिवलन गती किंवा दैनिक गती असे सुद्धा म्हणतात.

पृथ्वीला स्वत:भोवती एक फेरी पूर्ण करण्यास 23 तास 56 मिनीटे 4 सेकंद लागतात. सापेक्षता हा कालावधी चोवीस तासाचा मानला जातो. पृथ्वी स्वत:भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते.

पृथ्वीचा परिवलन वेग विषुववृत्तावर सर्वात जास्त असून ध्रुवावर सर्वात कमी आहे.

विषववृत्तावर पृथ्वीच्या परिवलनाचा वेग 1665.6 कि.मी. इतका आहे. पृथ्वीच्या परिवलन गतीमुळे पृथ्वीवर खालील परिणाम घडून आलेले आहेत.

दिवस व रात्र चक्र – पृथ्वीच्या परिवलन गतीमुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र होण्याचे चक्र सुरू झाले असून पृथ्वीच्या ज्या भागावरच सूर्यकिरण पडतात तो भाग प्रकाशमान होवून तेथे दिवस होतो व राहिलेल्या अर्ध्या भागावर अंधार पडतो म्हणजे तेथे रात्र होते. पृथ्वीवरील दिवस रात्र चक्र अखंड चालू आहे.

सागर प्रवाह – पृथ्वीच्या परिवलन गतीमुळे सागराच्या पाण्याला वेग प्राप्त होतो. विषवृत्तीय प्रदेशातील पाणी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जाते. यालाच सागर प्रवाह असे म्हणतात.

वार्‍यांना दिशा प्राप्त होते – पृथ्वीच्या परिवलन गतीमुळे वार्‍याची दिशा बदलते. याबाबतचा नियम फेरेल या शास्त्रज्ञाने मांडला. त्यांच्या मते पृथ्वीच्या परिवलन गतीमुळे उत्तर गोलार्धातील वारे त्यांच्या उजवीकडे आणि दक्षिण गोलार्धातील वारे डावीकडे झुकतात.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...