Thursday 21 November 2019

महाराष्ट्र राज्य भूगोल प्रश्नसंच

प्र.०१) महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती आहे ?

अ) 3,07,713 चौ.कि.मी. ✅
ब) 3,09,715 चौ.कि.मी.
क) 3,78,981 चौ.कि.मी.
ड) 3,79,490 चौ.कि.मी.

स्पष्टीकरण : महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ 3,07,713  आहे.

प्र.०२) क्षेत्रफळाच्या द्रष्टीने महाराष्ट्राचा देशात - - - - - - - -क्रमांक लागतो.

अ) पहिला
ब) दुसरा
क) तीसरा ✅
ड) चौथा

स्पष्टीकरण : पहिला क्रमांक : राजस्थान क्षेत्रफळ : 3,42,239 चौ.कि.मी.
दुसरा क्रमांक : मध्य प्रदेश : 3,08,252 चौ.कि.मी.
तीसरा क्रमांक : महाराष्ट्र राज्य क्षेत्रफळ : 3,07,713 चौ.कि.मी.

प्र.०३) भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्र - - - - - - - टक्के एवढा प्रदेश व्यापलेला आहे.

अ) 9.00
ब) 9.36 ✅
क) 9.50
ड) 10.00

स्पष्टीकरण : भारताचा महाराष्ट्र राज्याने 9.36 एवढा प्रदेश व्यापलेला आहे.

प्र.०४) महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार आहे ?

अ) आयातक्रती
ब) त्रिकोणाक्रती ✅
क) चौरसक्रती
ड) वर्तुळक्रती

स्पष्टीकरण : महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार हा त्रिकोणाक्रती आहे.

प्र.०५) महाराष्ट्रातील कोणते ठिकाण कोकणात आहे ?

अ) चिखलदरा
ब) तोरणमाळ
क) आंबोली
ड) गडचिरोली

स्पष्टीकरण : महाराष्ट्रातील आंबोली हे ठिकाण कोकणात आहे.

प्र.०६) कर्नाळा हे पक्षी अभयारण्य कोठे आहे ?

अ) चंद्रपूर
ब) अमरावती
क) रायगड ✅
ड) ठाणे

स्पष्टीकरण : कर्नाळा हे पक्षी अभयारण्य रायगड येथे आहे.

प्र.०७) व्रदांवन बाग कोणत्या राज्यात आहे ?

अ) गुजरात
ब) जम्मू - काश्मीर
क) कर्नाटक ✅
ड) महाराष्ट्र

स्पष्टीकरण : व्रदांवन बाग कर्नाटक राज्यात आहे.

प्र.०८) - - - - - - हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे.

अ) दिल्ली
ब) चेन्नई
क) मुंबई ✅
ड) हैद्राबाद

स्पष्टीकरण : मुंबई हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे.

प्र.०९) मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर - - - - - हे आहे.

अ) कांडला
ब) मार्मागोवा
क) हल्दीया
ड) न्हावा - शेवा ✅

स्पष्टीकरण : मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर न्हावा - शेवा हे आहे

प्र.१०) खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या द्रष्टीने सर्वात मोठा आहे ?

अ) पुणे
ब) नागपूर
क) ठाणे ✅
ड) कोल्हापूर

स्पष्टीकरण : खालीलपैकी ठाणे जिल्हा महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या द्रष्टीने सर्वात मोठा आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

महाराष्ट्रातील प्रमुख शिखर जिल्हा व उंची

🚦जिल्हा    🧗‍♂शिखर         उंची🌲 ------------------------------------------------- अहमदनगर     कळसुबाई        1646 नाशिक            स...