फील्ड मेडल 2022


◆ युक्रेनियन गणितज्ञ मेरीना वायझोव्स्का (Maryna Viazovska) यांना 5 जुलै 2022 रोजी प्रतिष्ठित फील्ड मेडल जाहीर झाला. 


◆ इराणी मरियम मिर्झाखानी (2014) नंतर फील्ड पदकप्राप्त वायाझोव्स्का या केवळ दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. 


➤ गणितातील नोबेल पारितोषिक म्हणून ओळखला जाणारा हा सन्मान यावर्षी 4 जणांना जाहीर झाला.


◆ इतर विजेत्यांमध्ये जिनेव्हा विदयापीठाचे फ्रेंच गणितज्ञ ह्यूगो डुमिनिल कॉपिन, प्रिन्स्टन विद्यापीठाचे कोरियन अमेरिकन गणितज्ञ जून हुह आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाचे ब्रिटिश गणितज्ञ जेम्स मेनार्ड यांचा समावेश आहे.


◆ विजेत्यांची घोषणा सामान्यतः गणितज्ञांच्या आंतरराष्ट्रीय काँग्रेसमध्ये केली जाते, जी या वर्षी रशियामध्ये होणार होती परंतु त्याऐवजी ते हेलसिंकी येथे हलवण्यात आली.

No comments:

Post a Comment

Latest post

ZP पद भरती Strategy

📌📌 Strategy📌📌                मागचे तीन दिवस आयबीपीएस(IBPS) ने पशुसंवर्धन विभागासाठी परीक्षा घेतल्या. या परीक्षांमधील मराठी आणि इंग्लिश...