Saturday 1 February 2020

ब्रिटन अखेर युरोपीय संघातून बाहेर.

🎆 ब्रिटनने अखेर युरोपियन महासंघाचे सदस्यत्व सोडले आहे. काल रात्री ११ वाजता ब्रिटन युरोपियन महासंघामधून बाहेर पडला. यावेळी ब्रेक्झिट समर्थकांनी जल्लोष आणि विरोधकांनी निदर्शनं केली.

🎆 ब्रेक्झिटच्या बाजूनं सार्वमत घेतल्यानंतर जवळपास ३ वर्षांनंतर ब्रिटन युरोपियन महासंघामधून बाहेर पडला आहे.

🎆 ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांनी युरोपियन महासंघासोबत मैत्रीपूर्ण सहकार्य कायम ठेवण्याचं आश्वासन यावेळी दिलं.

🎆 जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी आगामी वाटचालीत अनेक अडथळे असले तरी यशस्वी होणाऱ्या अनेक संधी असल्याचा आशावादही व्यक्त केला.

🎆 ब्रेक्झिट बाहेर पडण्याचा संक्रमण कालावधी ३१ डिसेंबर पर्यंत आहे.

🎆 तोपर्यंत युरोपियन महासंघाचे अनेक कायदे ब्रिटनमध्ये लागू राहतील तसंच युरोपियन महासंघामधल्या देशांत नागरिकांना मुक्तसंचार करता येईल.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...