Ads

30 December 2020

कर्नाटकमध्ये गोहत्या प्रतिबंधक विधेयक मंजूर



💮तीन आठवड्यांपूर्वी राज्याच्या विधानसभेत मंजूरी मिळाल्यानंतर कर्नाटकच्या कॅबिनेटने सोमवारी ‘गोहत्या प्रतिबंध आणि संरक्षण विधेयक 2020’  मंजूर केले.


💮तर आता हे विधेयक राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलं आहे. राज्यपालांनी त्यावर मोहोर उठवल्यानंतर त्याचं कायद्यात रुपांतर होईल.

तसेच या नव्या विधेयकानुसार, गायींची अवैध विक्री, अवैध वाहतूक दंडनीय अपराध असणार आहे.


💮जर गायीला एखादा संसर्गजन्य आजार जडला ज्यामुळे इतर गुरांमध्ये त्याचा फैलाव होऊ शकतो, अशाच वेळी त्या गायीची कत्तल केली जाऊ शकते, असं कर्नाटकचे कायदा मंत्री जे. सी. मधूस्वामी  यांनी म्हटलं आहे.


💮तर या विधेयकातील सेक्शन 1 (2) नुसार, गुरं म्हणजे गाय, गायीचं वासरु आणि बैल तसेच 13 वर्षांखालील म्हैस किंवा रेडा यांचा समावेश आहे.

या विधेयकानुसार, जर गोहत्या घडून आल्यास गुन्हा दाखल होऊन तीन ते पाच वर्षांचा तुरुंगवासही होऊ शकतो.


💮तसेच या शिक्षेसह कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याला 50,000 ते 5 लाखांचा दंडही भरावा लागणार आहे.

No comments:

Post a Comment