Tuesday 29 December 2020

राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) अंतर्गत 22 प्रकल्प पूर्ण.


🌺राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) मार्फत यावर्षी 22 प्रकल्प पूर्ण झाले. त्याव्यतिरिक्त सांडपाणी व्यवस्थापन, प्रदूषण कमी करणे, वनीकरण आणि जैवविविधता यांच्याशी संबंधित 17 नवीन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.


💠राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) विषयी....


🌺राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) ही राष्ट्रीय गंगा परिषदेची अंमलबजावणी करणारी शाखा आहे. ऑक्टोबर 2016 मध्ये लागू झालेल्या “गंगा नदी (पुनरुत्थान, संरक्षण व व्यवस्थापन) प्राधिकरणे आदेश 2016” अंतर्गत NMCG ची स्थापना झाली.


🌺पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे 2015 मध्ये ‘नमामि गंगे’ अभियानाची सुरुवात केली. हे अभियान राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) यांच्यावतीने चालवले जात आहे. अभियानात नदीच्या साफसफाईसाठी एकूण 20,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना पूर्ण केले जाणार आहे. यात नदीचा विकास, सांडपाण्याचा निचरा तसेच घाट आणि श्मशान जागांचे निर्माण अशी कार्ये चालवली जात आहेत.


💠गगा नदी....


🌺गगा नदी ही दक्षिण आशियातली भारत व बांग्लादेश या दोन देशातून वाहणारी एक प्रमुख नदी आहे. ब्रह्मपुत्रा नदीनंतर ही भारतातली सर्वात मोठी नदी आहे. गंगा नदीची लांबी 2,525 किलोमीटर आहे आणि तिचा उगम भारतातील उत्तराखंड राज्यात हिमालय पर्वतातल्या गंगोत्री येथे होतो. तेथून ती आग्नेय दिशेला वाहत येते व उत्तर भारतातल्या गंगेच्या खोऱ्यातून वाहत बांग्लादेशात प्रवेश करते. बांग्लादेशात ती बंगालच्या उपसागराला मिळते.

No comments:

Post a Comment

Latest post

भारतात मुस्लिम सत्तेची स्थापना

👉 1. महंमद गझनवी :- अकराव्या शतकापासून भारतावर तुर्काची आक्रमणे होण्यास सुरुवात झाली. गझनीचा तुर्क सत्ताधीश सबक्तगीन याने भारतावर स्वार्‍या...