Thursday 30 April 2020

मोदी सरकारचा मोठा निर्णय: इतर राज्यात अडकलेले विद्यार्थी, कामगारांना जाता येणार घरी


◾️केंद्रीय गृहमंत्रालयाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून देशभरात वेगवेगळ्या राज्यांमध्ये अडकलेल्या स्थलांतरित
📌 कामगार,
📌पर्यटक आणि
📌 विद्यार्थ्यांना आपापल्या घरी जाता येणार आहे.

◾️ केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंबंधीचा आदेश जारी केला आहे.

◾️ त्यांची ने-आण करण्याची व्यवस्था राज्य सरकारला करावी लागणार आहे.

🔰 आदेशात काय म्हटलं आहे ?

लॉकडाउनमुळे अनेक स्थलांतरित कामगार, भाविक, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर लोक वेगवेगळ्या ठिकाणी अडकले आहेत. त्यांना काही नियमांतर्गंत आपल्या घरी पाठवण्याची परवानगी देण्यात येत आहे.

🔴 सर्व राज्यांनी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करणं गरजेचं असून अडकलेल्या लोकांना पाठवताना किंवा प्रवेश देताना प्रोटोकॉलचं पालन करणं गरजेचं आहे. राज्यात अडकलेल्या लोकांची यादी नोडल अधिकाऱ्यांनी तयार करणं गरजेचं आहे.

🟠 जर एखाद्या ग्रुपला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करायचा असे तर दोन्ही राज्यांनी एकमेकांशी संपर्क साधून रस्त्याने वाहतूक करण्यावर संमती दर्शवणं गरजेचं आहे.

🟡 प्रवास करणाऱ्या व्यक्तीचं स्क्रिनिंग केलं जावं. ज्यांच्यामध्ये लक्षण नाहीत त्यांनाच प्रवासाची परवानगी दिली जावी.

🔵  प्रवासासाठी बसचा वापर केला जावा. या बसेसचं निर्जुंतीकरण करणं तसंच बसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं बंधनकारक असेल.

🟣 आपल्या इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर संबंधित लोकांची आरोग्य कर्मचाऱ्यांनी तपासणी करावी. .

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

सहकार

   11th सहकार  :- Click Here 12th सहकार  :- Click Here