पुण्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती.

🔰गेल्या काही दिवसांत पुण्यातील प्रामुख्याने शहरात  कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे.

🔰पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक कार्यवाही अधिक प्रभावी व गतिमान करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आणखी एक पाऊल टाकलं असून, त्यांच्या निर्देशानुसार अनिल कवडे, सौरभ राव, सचिंद्र प्रतापसिंग आणि कौस्तुभ दिवेगावकर या चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची पुणे शहरासाठी विशेष नियुक्ती करण्यात आली आहे.

🔰तर पुणे विभागीय आयुक्त आणि पुणे महापालिका आयुक्तांना कोरोनाविरुद्धच्या लढाईत हे अधिकारी सहाय्य करतील.राज्याच्या मुख्य सचिव कार्यालया मार्फत सोमवार रोजी यासंबंधीचे आदेश जारी करण्यात आले.

🔰तर अनिल कवडे हे राज्याचे सहकार आयुक्त आहेत. सौरभ राव यांच्याकडे साखर आयुक्तपदाची जबाबदारी आहे. तर सचिंद्र प्रतापसिंग यांच्याकडे पशुसंवर्धन आयुक्त व कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे भूजल सर्व्हेक्षण संचालकपदाचा कार्यभार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे प्रश्नसंच

241. ————— हा दिवस ‘जागतिक हिवताप दिन’ म्हणून साजरा केला जातो. A. 25 मार्च B. 25 एप्रिल C. 25 जून D. 25 जुलै ANSWER: B. 25 एप्रिल 242...