गांधीनगरमध्ये ‘आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण’ याची स्थापना झाली

भारतातल्या आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांमध्ये (IFSC) होणार्‍या सर्व आर्थिक क्रियाकलापांचे नियमन एकाच जागी करण्याच्या उद्देशाने गुजरातच्या गांधीनगर या शहरात ‘आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण’ (International Financial Services Centres Authority) याची स्थापना करण्यात आली आहे.

27 एप्रिल 2020 हा दिवस प्राधिकरणाचे स्थापना दिन असणार आणि त्याचे मुख्यालय गांधीनगर येथे असणार अशी अधिकृत घोषणा केंद्र सरकारने केली.

वर्तमानात, भारतात आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांमधले (IFSC) बँकिंग, भांडवली बाजारपेठ आणि विमा हे क्षेत्र अनेक नियामकांद्वारे नियमित केले जात आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI), भारतीय रोखे व विनिमय मंडळ (SEBI), निवृत्तीवेतन निधी नियंत्रण व विकास प्राधिकरण (PFRDA) आणि भारतीय विमा नियंत्रण व विकास प्राधिकरण (IRDAI) या संस्थांकडून हा कारभार व्यवस्थापित केला जात आहे.

आता, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (IFSCA) हे भारतातल्या आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांमध्ये (IFSC) चालणार्‍या सर्व आर्थिक क्रियाकलापांमध्ये समन्वय राखणारी, नियंत्रण राखणारी व त्यांचे व्यवस्थापन करणारी संस्था असणार आहे.

IFSCA संस्थेचे स्वरूप

🔸आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (IFSCA) यात अध्यक्षांसह एकूण नऊ सदस्यांचा समावेश असणार आहे आणि त्या सर्वांची नियुक्ती केंद्र सरकार करणार. हे सदस्य RBI, SEBI, IRDAI व PFRDA यांचे प्रत्येकी एक आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे दोन अधिकारी कर्मचारी असणार आहेत. उर्वरित दोन सदस्यांची नेमणूक शोध समितीच्या शिफारशीवरून केली जाणार.

🔸ही संस्था ‘विशेष आर्थिक क्षेत्र कायदा-2005’ अन्वये स्थापन करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

 Q.1) इन्फोसिस पुरस्कार 2023 मध्ये भौतिकशास्त्र श्रेणीतील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ✅ प्रो. मुकुंद थट्टाई Q.2) पहिल्या ‘लाईफटाईम डिस्ट...