Ads

01 May 2020

आयआयटीची यंदा शैक्षणिक शुल्क वाढ नाही.

- भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) व भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (आयआयआयटी) यांचे शैक्षणिक शुल्क २०२०-२१ या वर्षांत वाढवण्यात येणार नाही, असे मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी सांगितले.

- करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगून  ते म्हणाले की, आयआयटी संचालकांची स्थायी समिती व आयआयटी संचालक यांच्याशी चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

- आयआयआयटी म्हणजे भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थामधील ज्या संस्था केंद्राच्या अनुदानावर चालतात त्यांच्या स्नातक पूर्व अभ्यासक्रमांसाठी १० टक्के शैक्षणिक शुल्क वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता पण त्याची अंमलबजावणी या वर्षी करण्यात येणार नाही.

- या संस्थांच्या कुठल्याच वर्गासाठी शुल्कवाढ करू नये असे संचालकांना सांगण्यात आले आहे.

- ज्या भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (आयआयआयटी) सरकारी खासगी भागीदारीत चालतात त्यांचीही शुल्क वाढ करू नये असे आदेश जारी करण्यात आले आहेत.
--------------------------------------------------

No comments:

Post a Comment