Tuesday 26 November 2019

तापमान वाढ असह्य; २०१९ दुसरे सर्वाधिक ‘उष्ण’ वर्ष


🔥मुंबई : गेल्या काही वर्षांपासून ग्लोबल वॉर्मिंगमुळे उष्ण वर्षांच्या नोंदीत भर पडत आहे. १९९८ पासून जागतिक पातळीवर नोंदविलेल्या उष्ण वर्षांपैकी २०१६ नंतर २०१९ हे दुसरे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरल्याची नोंद नॅशनल ओशिएन अँड अ‍ॅटमॉसफेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या नॅशनल सेंटर्स फॉर एन्व्हायर्नमेंटल इन्फॉर्मेशनने केली. १९९८सह २००५, २००९, २०१०, २०१३, २०१४, २०१५, २०१६, २०१७, २०१८ या वर्षांची उष्ण वर्ष म्हणून नोंद झाली.

🔥नॅशनल सेंटर्स फॉर एन्व्हायर्नमेंटल इन्फॉर्मेशनकडील माहितीनुसार, अल निनोसह तत्सम घटकांमुळे तापमानात उत्तरोत्तर वाढ होत आहे. मुळात जमिनीसह समुद्रावरील वाढते तापमान, ग्लोबल वॉर्मिंगसह प्रदूषणात पडणारी भर; असे अनेक घटक वाढत्या उष्ण वर्षांस कारणीभूत आहेत. नॅशनल ओशिएन अँड अ‍ॅटमॉसफेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशननेही २०१९ सालच्या सात महिन्यांतील तापमानाची नोंद घेत, त्याची १८८० सालापासून आतापर्यंत म्हणजे १४० वर्षांतील माहितीसोबत तुलना केली. त्यावेळी तापमानवाढीतील फरक समोर आला.

🔥जुलैमध्ये युरोपसह ग्रीनलँड उष्णतेच्या लाटेने होरपळून निघाला. जुलैमध्ये अलास्का, पश्चिम कॅनडा, मध्य रशिया येथील तापमान हे सरासरी तापमानापेक्षा ३ अंशांनी अधिक होते. जानेवारी ते जुलै, २०१९ हा काळ तिसरा उष्ण काळ ठरला. दरम्यान, जागतिक तापमानवाढ १.५ अंश सेल्सिअसच्या पुढे जाता कामा नये, असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...