मराठी शुद्ध लेखनाचे नियम

अनुस्वार      

▫️ नाकापासून स्पष्टपणे उच्चार होणा-या अक्षरावर नेहमी अनुस्वार द्यावा.     

उदा.

डोंगर, सतरंजी, धंदा, कुंभार, अंधार, पंचमी. इ.

▫️ नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्य रूपांवर अनुस्वार द्यावा.       

उदा.

लोकांना, मुलांकडून, मित्रांचे, घोड्यांसाठी, त्यांना इ.         

▫️ आदरार्थी अनेकवचनी (बहुवचनी) नामांच्या सामान्य रूपांवर अनुस्वार द्यावा.     

उदा.

शिक्षकांनी, वडिलांनी, आजोबांनी, विवेकानंदांनी, रानडेंनी इ.

▫️ पुढील शब्दांवर अनुस्वार देऊ नये.         

जसे - का, की, केळे, करू, करताना, रवेळू, घरात, घरी, जाऊ, तेथे, तेव्हा, जेथे, जेव्हा, झोप, नाव, नवे, पाच, बसू, माती, लाकूड, शाळेत. (कारण - या शब्दात अनुनासिकाचा स्पष्ट उच्चार होत नाही)

हस्व - दीर्घ अक्षरे

▫️ इ - कारान्त आणि 'उ’ - कारान्त शब्दातील शेवटचे अक्षर नेहमी दीर्घ लिहावे.         

उदा -

मी, कवी, गुरू, बाहू जू, ऋषी, गती, वही, गहू पेरू, वाळू, शत्रू.      

परंतु असे शब्द जोडशब्दात आल्यास हा शेवटचा ई कार व ऊ कार हस्व होतात.         

उदा -

विद्यार्थिभांडार ऋषिकुमार, कविचरित्र, लघुकथा, शत्रुपक्ष इ.         

अपवाद - अति, आणि, नि, परंतु, तथापि, अद्यापि, यद्यपि, प्रभृति, यथामति, यथाशक्ति, इति, ही अवये हस्वातच लिहावी.     

▫️ सामासिक शब्दातील पहिले पद हस्व 'इ' कारान्त किंवा 'उ' कारान्त असल्यास ते हस्वातच राहते. आणि ते पद दीर्घ 'ई' कारान्त किंवा ऊ' कारान्त तत्सम शब्द असल्यास ते दीर्घातच राहते.   

उदा -

कविचरित्र, गतिमान, गुरुवर्य, पशुपक्षी, युक्तिवाद, लघुकथा, वायुपुत्र, शक्तिमान, हरिनाम, गौरीहर, वधूवर इ.

एकाक्षरी शब्द दीर्घ असावेत -

उदा -

मी, तू, ती, ही, जी, ऊ, थू, धू, पी, पू, शी इ.            

▫️ शब्दातील अन्त्य अक्षर दीर्घ असल्यास उपान्त्य अक्षर हे बहुधा हस्व असते.       

उदा-

दिवा, जुनी, किती, मुळा, महिना, वकिली, गरिबी, गुरुजी, माहिती, सुरू, हुतुतू इ.        

अपवाद - संस्कृत मधून मराठीत आलेल्या तत्सम शब्दांना हा नियम लागू नाही.         

उदा -

परीक्षा, प्रतीक्षा, गीता, पूजा इ.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नसंच

1.कोणत्या आशियाई देशाने लिथियम आणि ग्रेफाइटसह 20 गंभीर खनिज ब्लॉक्सचा ई-लिलाव सुरू केला आहे? [अ] श्रीलंका [ब] इंडोनेशिया [क] भारत [डी] बांगल...